Nashik : मक्तेदारांनो सावधान ! दर्जेदार कामे न केल्यास कठोर कारवाई, कुंभमेळा विकासकामांबाबत मनपा प्रशासनाचा इशारा

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेली सर्व विकासकामे दर्जेदार, सुरक्षित आणि नियमानुसार पूर्ण व्हावीत यासाठी महानगरपालिकेकडून सातत्याने देखरेख ठेवण्यात येत आहे. कामांमध्ये कोणतीही त्रुटी किंवा अनधिकृत प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी दिला आहे.


आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध पायाभूत सुविधा विकासकामे वेगाने सुरू आहेत. देशदूत सर्कल परिसरात सुरू असलेल्या चेंबरच्या कामासंदर्भात महापालिकेने स्पष्टीकरण दिले आहे. सदर कामाबाबत मक्तेदाराकडून खुलासा मागविण्यात आला असता, काँक्रीटच्या कामासाठी आवश्यक क्युरिंग कालावधी द्यावा लागत असल्याने कामाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू होती, असे सांगण्यात आले. तसेच ताजे काँक्रीट शेजारील चेंबरमध्ये जाऊ नये यासाठी खबरदारी म्हणून तात्पुरत्या स्वरूपात विटांचा आधार देण्यात आला होता.



काँक्रीट स्थिर झाल्यानंतर हे तात्पुरते बांधकाम हटवून त्याठिकाणी नियमानुसार नवीन चेंबर बांधण्यात येणार असल्याचे मक्तेदाराने स्पष्ट केले. या स्पष्टीकरणाच्या अनुषंगाने डिपीआर कन्सल्टंट आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) यांच्यामार्फत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पाहणीनंतर संबंधित ठिकाणी तात्पुरत्या नियोजनाचा भाग म्हणून लाकडी फळ्या, स्टील प्लेट्स किंवा तत्सम उपाययोजना केल्या जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रसारित झालेल्या व्हिडिओमधील माहिती पूर्णपणे वस्तुस्थितीला धरून नसल्याचे महापालिकेने नमूद केले आहे.



मक्तेदारावर ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई


प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांनी संबंधित मक्तेदारास तात्पुरते बांधकाम तातडीने हटवून त्याठिकाणी नव्याने गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. निर्धारित मुदतीत हे काम पूर्ण न केल्याने करारातील अटींनुसार संबंधित मक्तेदारावर ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच कामाचा दर्जा, सुरक्षितता आणि तांत्रिक निकषांचे काटेकोर पालन करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.



गोदाघाट सुरक्षेसाठी महत्त्वाच्या आठ ठिकाणी स्वतंत्र पथक


दरम्यान, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामे आणि भाविक तसेच स्थानिक यांची सुरक्षा यादृष्टीने प्रशासनकडून पाऊले उचलली जात आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामे वेगाने सुरु असतानाच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. नाशिक शहर पोलिसांनी रामकुंड, गोदाघाट व परिसरातील धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी व्यापक नियोजन केले आहे. भाविकांची वाढती गर्दी, धार्मिक कार्यक्रम आणि कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने प्रत्येक घाटासाठी सुरक्षेचा भार आता परिक्षावधीन पोलिस उपनिरीक्षकांवर असेल.


महत्त्वाचे म्हणजे शहर आयुक्तालयात प्रशिक्षण पूर्ण करुन नव्यानेच रुजू झालेल्या आठ पोलिस उप निरीक्षकांपैकी सहा पोलिस उपनिरीक्षकांची नियुक्ती सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी या तीन पोलिस ठाण्यात आठ दिवसापूर्वीच केली होती. त्यांच्या कार्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांवर असेल.


याशिवाय वाहतूक नियंत्रणासाठी ट्राफिक वॉर्डनची नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण घाट परिसराच्या बंदोबस्ताची जबाबदारी सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत मोहिते यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. नूतन पोलिस उपनिरीक्षक प्रतिक राउत, कल्याणी नजन, सुनिल ठेंग, अशोक दिंडे, आदिनाथ कदम, अन्वर इमाम मुलाणी यांच्यावर गोदाघाट सुरक्षेची जबाबदारी असेल.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.