Nashik Crime : ‘तू एकट्यानेच मटण का खाल्ले?’ मित्र संतापला अन उकळते पातेले थेट...

Nashik Crime : मित्रांची दारू पार्टी अन त्यात मटण म्हटल्यावर अनेकांसाठी ही मजा काही औरच असते. पण नाशिकच्या एका तरुणाला मात्र ही दारू पार्टी अन त्यातले मटण चांगलेच महागात पडले आहे. मित्रांसोबत रंगलेली मटण पार्टी (Nonveg Party) शहरातील एका ४० वर्षीय व्यक्तीसाठी गंभीर स्वरूपाची ठरली. दारूच्या नशेत मटणाच्या भाजीतील खांड खाण्यावरून दोन मित्रांमध्ये झालेला किरकोळ वाद इतका विकोपाला गेला की, संतप्त झालेल्या एका मित्राने चुलीवर उकळत असलेले मटणाचे पातेले थेट दुसऱ्याच्या अंगावर ओतले. या धक्कादायक प्रकारात भगूर (Bhagur) येथील सोमनाथ रमेश साळवे (वय ४०) हे गंभीर भाजले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



मटणाच्या खांडाने केला कांड


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २२) साळवे आणि त्यांचा मित्र रघू यांनी एकत्र मटण पार्टी करण्याचे ठरवले होते. दोघांनी मटण आणि मद्याची खरेदी करून साळवे यांच्या घरी स्वयंपाकाची तयारी सुरू केली. चुलीवर मटण शिजत असताना दोघेही मद्यप्राशन करत होते. दरम्यान, साळवे यांनी भाजीतील काही मोठे मटणाचे खांड काढून खाल्ले. याच गोष्टीचा रघूला राग आला.


‘तू एकट्यानेच मटण का खाल्ले?’ असा जाब विचारत त्याने साळवे यांच्याशी वाद घातला. काही क्षणांतच हा वाद शिवीगाळ आणि धक्काबुक्कीत बदलला. रागाच्या भरात रघूने चुलीवर उकळत असलेले मटणाचे पातेले उचलून थेट साळवे यांच्या अंगावर ओतले. उकळता रस्सा आणि गरम भाजी अंगावर पडल्याने साळवे गंभीररीत्या भाजले. त्यांच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, छातीवर, पोटावर आणि हातांवर गंभीर दुखापत झाली.



घरातून अचानक आरडाओरडा ऐकू आल्याने शेजारी राहणारे साळवे यांचे भाऊ आणि इतर कुटुंबीय घटनास्थळी धावले. त्यावेळी घरात सर्वत्र मटणाचा सडा पडलेला होता. गंभीर अवस्थेतील साळवे यांना तातडीने कॅन्टोन्मेंट रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेची नोंद देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात (Deolali Camp Police Station) करण्यात आली असून आरोपी रघूचा पोलीस शोध घेत आहेत.



संशयिताचा शोध सुरू


दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. क्षुल्लक कारणावरून झालेला वाद टोकाला गेला. उकळता पदार्थ अंगावर ओतणे हा गंभीर गुन्हा असून त्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयिताचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल.


उमेश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, देवळाली कॅम्प पोलीस ठाणे

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण