Nitesh Rane : भारतात बाबासाहेबांचे संविधानच चालेल, 'शरिया कानून' नाही!

परतूरच्या घटनेवरून मंत्री नितेश राणेंनी ठणकावले; जिहाद आणि शरिया कायद्याची भाषा करणाऱ्या संघटनांवर बंदी घाला


मुंबई : "भारतात फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानच चालेल, इथे कोणाचा 'शरिया कानून' किंवा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड चालणार नाही. ज्यांना या देशात राहून जिहाद करायचा असेल, शरिया कायदा आणायचा असेल आणि पाकिस्तानात बसलेल्या आपल्या अब्बांचे गोडवे गायचे असतील, त्यांनी तात्काळ गाशा गुंडाळून पाकिस्तानात निघून जावे," असा हल्लाबोल राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Minister Nitesh Rane) यांनी बुधवारी केला.



जालना जिल्ह्यातील परतूर येथील 'किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल'च्या (Kids World English School) वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमादरम्यान शाळकरी मुलांनी हातात बनावट तलवारी घेऊन 'गुस्ताख-ए-नबी की एक सजा' या पाकिस्तानी गाण्यावर नृत्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी दहशतवादी मुमताज कादरी याचे छायाचित्र प्रदर्शित करण्यात आल्याचेही समोर आले आहे. त्यानंतर सकल हिंदू समाजाच्या वतीने परतूरमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. याबाबत मंत्री राणे यांनी विधानभवनाच्या आवारात माध्यमांशी संवाद साधला. महायुती सरकार या मोर्च्यातील हिंदू समाजाच्या प्रत्येक मागणीची निश्चित दखल घेईल, असा विश्वासही त्यांनी या वेळी दिला.




नितेश राणे म्हणाले, "काल सभागृहात विरोधकांनी जी पाकिस्तानची तळी उचलून धरली होती, त्याचेच घाणेरडे चित्र परतूरच्या शाळेत पाहायला मिळाले. लहान मुलांसमोर पाकिस्तानशी निगडित गाणी आणि 'सर तन से जुदा'चे नारे वाजवून जिहाद कसा असतो, हे दाखवण्याचा नीच प्रयत्न केला गेला. आमचे पोलीस खाते या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. परंतु, ही जिहादी मानसिकता आमच्या या महाराष्ट्रात आणि हिंदू राष्ट्रात मुळीच खपवून घेतली जाणार नाही. पाकिस्तानच्या विचारांचे जे कोणी हिरवे साप आमच्या महाराष्ट्रात दडून बसले असतील, त्यांना शोधून ठेचण्याचे काम आमचे हिंदुत्ववादी महायुती सरकार करेल. आपल्याच देशात राहून शरिया कायद्याची भाषा करणाऱ्या संघटना तात्काळ बरखास्त (स्क्रॅप) करून त्यांच्यावर बंदी आणली पाहिजे. अशा बोर्डांच्या सर्व सदस्यांना अटक करून तुरुंगात डांबले पाहिजे", असेही नितेश राणे म्हणाले.


समाजकंटकांसाठी आमचे 'स्पेशल डोस' आणि 'इंजेक्शन' तयार!

दिलेला शब्द पूर्ण करणे आणि कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांना तात्काळ रोखठोक उत्तर देणे, हीच आमच्या सरकारची खरी ओळख आहे, राणे म्हणाले. पोलीस यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर असून असली नाटके करणाऱ्यांवर त्वरित कारवाई केली जाईल. असे काही समाजकंटक अजूनही फिरत असतील, तर त्यांच्यासाठी आमच्याकडे योग्य औषधोपचार तयार आहेत. काही जणांना गोळ्या द्याव्या लागतात, तर काहींना विशेष 'इंजेक्शन' द्यावे लागते; वेळ आल्यावर आम्ही ते निश्चित देऊ," असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला.


संजय राऊतांनी कधी 'डास'देखील मारलेला नाही

उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी हातात बंदूक असलेला फोटो समाज माध्यमांवर प्रसारित केला आहे. याविषयी माध्यमांनी विचारले असता नितेश राणे खोचकपणे म्हणाले, "संजय राऊत आणि बंदुकीचा काय संबंध? खेळण्याच्या दुकानातही बंदूक मिळते. या संजय राजाराम राऊतने आयुष्यात कधी साधा डाससुद्धा मारलेला नाही. जेव्हा राणे साहेबांनी शिवसेना सोडली आणि 'सामना' कार्यालयासमोर साहेबांची तोफ धडाडणार होती, तेव्हा हा माणूस भीतीपोटी तब्बल ३ तास स्वतःला बाथरूममध्ये लॉक करून बसला होता. जोपर्यंत राज साहेब आणि उद्धव ठाकरे सामना ऑफिसमध्ये पोहोचले नाहीत, तोपर्यंत हा बाथरूमच्या बाहेर आला नाही. हा डायपर घालणारा माणूस काय बंदुका उचलण्याची भाषा करतो?" बंदुकीचे फोटो दाखवून किंवा लाखो मतांनी निवडून आलेल्या खासदारांवर अपशब्दांत टीका करून कोणी मर्दानगी सिद्ध करू शकत नाही. चौकात भेटल्यावर बंदूक कशी असते ते मी स्वतः दाखवीन, असे आव्हानही त्यांनी दिले.



उबाठाने केलेली घाण साफ करायला थोडातरी वेळ लागेल


मुंबईतील पहिल्याच पावसात झालेल्या तुंबईवरून उद्धव ठाकरे (Udhaav Thackarey )यांच्यावर निशाणा साधताना राणे म्हणाले, "गेली २५-३० वर्षे हे लोक मुंबई महानगरपालिकेत बसून भ्रष्टाचार करत होते. त्यांनी वर्षांनुवर्षे जी घाण करून ठेवली आहे, जो गाळ साचवला आहे, तो साफ करायला आमच्या भाजपच्या महापौरांना आणि महायुती सरकारला थोडा वेळ द्यावा लागेल. हा गाळ हळूहळू पूर्णपणे साफ केला जाईल, मुंबईकरांनी निश्चिंत राहावे. आता आम्हाला ठाकरे-बिकरे आठवत नाहीत. ठाकरे आता फक्त जामा मशिदीतील लोकांनाच आठवतात, आम्हाला नाही!", असा टोलाही त्यांनी लगावला.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.