Nashik : नाशिक पोलिस दलात मोठे फेरबदल; आयुक्तालयात तीन नवे एसीपी, ग्रामीणला नवे डीवायएसपी

Nashik : राज्यातील पोलिस प्रशासनातील (Police Administration) महत्त्वाच्या बदल्यांचा मार्ग अखेर मोकळा झाला असून अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) आणि उपअधीक्षक (DySP) पदांच्या बदल्यांना मंगळवारी (दि. २३) मुहूर्त लागला. राज्य शासनाच्या गृह विभागाने भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) तसेच राज्य पोलिस सेवेतील २०० हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून त्याचा परिणाम नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिस दलावरही झाला आहे.



नाशिक पोलिस दलात मोठे फेरबदल


या बदल्यांमुळे नाशिक पोलिस आयुक्तालयाला तीन नवे सहायक पोलिस आयुक्त मिळाले आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेची ताकद वाढविण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. यामुळे सध्या अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांवरील ताण कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


विशेष म्हणजे, नाशिक आयुक्तालयातील कार्यरत तीन एसीपींना त्यांच्या पदावरच आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. गुन्हे व विशेष शाखेचे एसीपी संदीप मिटके, अंबड विभागाचे एसीपी सचिन बारी आणि पंचवटी विभागाचे एसीपी शेखर देशमुख हे पुढील वर्षभर त्याच पदावर कार्यरत राहणार आहेत. तर सरकारवाडा विभागाचे एसीपी सुधाकर सुरडकर यांची ठाणे पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे.



जिल्ह्याला विविध पदांवर 10 नवे अधिकारी


राज्य शासनाच्या या आदेशानुसार नाशिक शहर आणि जिल्ह्याला विविध पदांवर तब्बल दहा नवे अधिकारी मिळाले आहेत. यामध्ये काही अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली असून काहींना नव्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग येथे कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक दिलीप पिठे यांची महाराष्ट्र पोलिस अकादमी (एमपीए) येथे पोलिस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर बुलडाणा येथील पोलिस निरीक्षक पंडित सोनावणे यांची नाशिक येथील नागरी हक्क संरक्षण विभागात उपअधीक्षकपदी बदली झाली आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलिस अकादमीतील दिलीप ठाकूर आणि सीमा परिहार यांनाही उपअधीक्षक पदाची पदोन्नती मिळाली आहे.


नाशिक शहर वाहतूक शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांची अहिल्यानगर पोलिस मुख्यालयात उपअधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. तसेच पोलिस निरीक्षक किशोर चौधरी यांना महाराष्ट्र पोलिस अकादमीत उपअधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ग्रामीण पोलिस दलातही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. रमेश माणगावकर यांची मालेगाव ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) म्हणून नियुक्ती झाली असून ब्रह्मदेव शेळके हे आता कळवण उपविभागाचे एसडीपीओ म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. याशिवाय नाशिकच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे उपअधीक्षक गुलाबराव पाटील यांची नंदुरबार येथे बदली झाली असून त्यांच्या जागी सतीश गोराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



नाशिक पोलीस आयुक्तालयात ३ नवे एसीपी


दरम्यान, नाशिक आयुक्तालयासाठी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पूमन पाटील यांचा समावेश आहे. अकोला पीटीसीमधून त्यांची एसीपी, नाशिक शहर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच एसीबी, नाशिक येथे कार्यरत असलेले माधव रेड्डी यांचीही एसीपी म्हणून नाशिक शहरात बदली झाली आहे. नाशिक शहरातील पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांनाही पदोन्नती देत एसीपी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


याशिवाय महाराष्ट्र पोलिस अकादमीतील डीवायएसपी कविता फडतरे यांची नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक शहरातील पोलिस निरीक्षक सुरेखा पाटील यांची नाशिक ग्रामीणमध्ये उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मनमाडचे एसडीपीओ बाजीराव महाजन यांना त्यांच्या पदावर आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. तर नाशिक येथील भगीरथ देशमुख यांची राज्य गुप्तवार्ता विभागात (एसआयडी) अपर उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. धुळे येथे कार्यरत असलेले संजय बांबळे यांची नाशिक ग्रामीणमध्ये एसडीपीओ म्हणून नियुक्ती झाली आहे.


आगामी सिंहस्थ कुंभमेळा, वाढती कायदा-सुव्यवस्था आणि गुन्हेगारी नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले हे फेरबदल नाशिक पोलिस दलासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे शहर आणि ग्रामीण भागातील पोलिस प्रशासन अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

NCP Core Committee Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची देवगिरी येथे महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बांधणीवर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार

Ashok Kharat Case : पीडित स्त्रियांवर...अशोक खरातच्या आज सुनावणीत न्यायालयात काय घडलं ?

Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.