Dombivli Shardul Vichare : डोंबिवलीच्या शार्दुलने CA इंटरमीडिएटमध्ये देशात पटकावला पहिला क्रमांक

डोंबिवली : डोंबिवलीतून अभिमानाची बातमी समोर आली आहे. डोंबिवलीच्या शार्दुल शेखर विचारे याने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India - ICAI) आयोजित सीए इंटरमीडिएट (CA Intermediate) परीक्षेत देशभरातून प्रथम क्रमांक (All India Rank 1) मिळवत ऐतिहासिक (Historic) कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय यशामुळे शार्दुलने केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण डोंबिवलीचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.

CA फाउंडेशन (CA Foundation) मध्येही मिळवला होता तिसरा क्रमांक


शार्दुलचा यशाचा प्रवास यापूर्वीच सुरू झाला होता. त्याने सीए फाउंडेशन (CA Foundation) परीक्षेत देशात तिसरा क्रमांक (AIR 3) मिळवला होता. त्यानंतर त्याने लगेचच सीए इंटरमीडिएट (CA Intermediate) परीक्षेची तयारी सुरू केली. आपल्या यशाचे श्रेय (Credit) त्याने आई-वडील, बहीण, मित्र, क्लासेस आणि कॉलेजला दिले आहे.


अभ्यासाची रणनीती (Strategy) काय होती?


शार्दुलने सांगितले की, सुरुवातीला तो दररोज ७ ते ८ तास क्लासेस (Classes) करत होता. त्यानंतर घरी आणखी २ तास सेल्फ स्टडी (Self Study) करत असे. सात महिन्यांनंतर क्लासेस पूर्ण झाल्यावर त्याने घरच्या अभ्यासावर अधिक भर दिला. परीक्षा (Exam) जवळ आल्यानंतर तो दररोज ८ ते १० तास सातत्याने (Consistently) अभ्यास करत होता.
Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण