Gokul Gite : "निकालाच्या चार दिवस आधीच ठरलं होतं सगळं"; श्रीकांत शिंदेंसोबतच्या 'त्या' गुप्त भेटीचा गोकुळ गीतेंचा मोठा दावा

Gokul Gite : विधान परिषद निवडणुकीत (Legislative Council Election) नाशिकच्या जागेवर अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवणारे आमदार गोकुळ गीते (MLA Gokul Gite) यांनी निकालानंतर झालेल्या राजकीय घडामोडींवर मोठा खुलासा केला आहे. मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी आपण खासदार श्रीकांत शिंदे यांची गुप्त भेट घेतली होती आणि निकालाच्या तब्बल चार दिवस आधीच शिंदेसेनेसोबत जाण्याचा निर्णय निश्चित झाला होता, असा दावा त्यांनी केला.


नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांचा पराभव करून गोकुळ गीते यांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे निकाल जाहीर होताच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिंदेसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागील पडद्यामागच्या घडामोडींचा आता त्यांनी उलगडा केला आहे.



१०० पेक्षा जास्त मतांनी जिंकलो तर मला स्वीकारा


गोकुळ गीते म्हणाले, मतदान संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी श्रीकांत शिंदे यांची गुप्त भेट घेतली. त्या भेटीत त्यांनी नाशिकची जागा आपण १०० हून अधिक मतांनी जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. "जर मी १०० पेक्षा कमी मतांनी विजयी झालो, तर पुढील सहा वर्षे अपक्ष आमदार म्हणून काम करेन. मात्र, १०० पेक्षा जास्त मतांनी जिंकलो, तर मला शिंदेसेनेत स्वीकारावे," अशी विनंती आपण श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली होती, असे गीते यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, निकालाच्या आदल्या दिवशी श्रीकांत शिंदे यांनी ही संपूर्ण माहिती एकनाथ शिंदे यांना दिली होती. निकालानंतर आपण त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनाही आनंद झाल्याचे गीते यांनी सांगितले.



महायुतीकडून उमेदवारी का मिळाली नाही ?


गीते यांनी यावेळी उमेदवारीच्या राजकारणावरही भाष्य केले. महायुतीमध्ये नाशिकची जागा शिंदेसेनेच्या वाट्याला आल्यानंतर आपण एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पक्षाकडून उमेदवारी देण्याची विनंती केली होती. मात्र, नरेंद्र दराडे यांना पक्षप्रवेशावेळी उमेदवारीचे आश्वासन दिले असल्याने शिंदेंनी आपला शब्द पाळला आणि त्यांनाच उमेदवारी दिली, असे गीते म्हणाले.



माघारीसाठी दबाव, तरीही कार्यकर्त्यांनी फिरवली बाजी


अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपल्यावर माघार घेण्यासाठी मंत्रीस्तरावरून मोठा दबाव आणण्यात आला होता, असा दावाही गीते यांनी केला. या दबावामुळे आपण प्रचार थांबवला होता. मात्र, कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि शेवटपर्यंत लढा कायम ठेवला.माझ्या कार्यकर्त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या मेहनतीमुळेच हा विजय शक्य झाला,असे सांगत गोकुळ गीते यांनी आपल्या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना दिले.


गोकुळ गीतेंच्या या खुलाशामुळे नाशिक विधान परिषद निवडणुकीमागील राजकीय घडामोडींवर नव्याने चर्चा सुरू झाली असून, निकालापूर्वीच पडद्यामागे मोठी राजकीय रणनीती आखली गेल्याचा दावा आता चर्चेचा विषय ठरत आहे.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.