Eknath Shinde : विमुक्त व भटक्या जमातीच्या राष्ट्रीय अध्यक्षाची जबाबदारी ना. संजय राठोड यांच्यावर!

शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी दाखविला विश्वास


मुंबई,  शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे(Balasaheb thakre) आणि शिवसेना पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून कार्य करणारे शिवसेनेचे नेते तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय दुलीचंद राठोड यांच्यावर शिवसेना पक्षाने विमुक्त व भटक्या जमातीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.


मुंबई येथे नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या हिरक महोत्सव मेळाव्यात शिवसेना प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात "संजय राठोड(Sanjay Rathod) हे बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेते आहेत" असा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. "वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी देशभर फिरण्याची आपण त्यांना मोकळीक दिली आहे. त्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे. त्यांच्यावर आपण लवकरच मोठी जबाबदारी सोपवणार आहोत", असा सूतोवाच उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केले होते.



त्याचाच परिणाम म्हणून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेनेते मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीने २३ जून २०२६ रोजी जारी केलेल्या नियुक्तीपत्रानुसार, संजय राठोड यांची 'विमुक्त व घुमंतू जनजाती राष्ट्रीय नेता' पदी नियुक्ती करण्यात आली आहे.


दुहेरी जबाबदारी
या नियुक्तीसह ना. संजय राठोड यांच्याकडे दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. एक, पश्चिम विदर्भात शिवसेना संघटन विस्तार करणे. दुसरी, राज्य व देशभरातील भटक्या व विमुक्त समाजात पक्षाचा संघटनात्मक ढाचा मजबूत करून विस्तार व सुदृढीकरण करणे.



समाजाच्या सशक्तीकरणावर भर
नियुक्तीपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, भटक्या व विमुक्त समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय सशक्तीकरणासाठी विशेष प्रयत्न करणे, तसेच या समाजाला मुख्य प्रवाहात जोडून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निरंतर कार्य करणे, ही श्री.राठोड यांची महत्त्वाची जबाबदारी असेल.


पत्रात म्हटले आहे की, "संजय राठोड यांच्या सामाजिक कार्यातील योगदान व संघटनात्मक क्षमता लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्व, अनुभव व कार्यकुशलतेच्या बळावर राज्य व देशभर विमुक्त व भटक्या समाजात शिवसेना पक्ष अधिक मजबूत होईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे."



हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे(Anand Dighe) यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन, सर्वांना सोबत घेऊन पक्षाच्या विकासासाठी समर्पित भावनेने काम करावे, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त केली आहे.


"आमचे नेते, पक्ष प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) व शिवसेना युवानेते तथा खासदार श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला पात्र होण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करीन", अशी प्रतिक्रिया मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Gmail Storage : Google Photos आणि Gmail चे स्टोरेज फुल झाले? एकही रुपया खर्च न करता अशी रिकामी करा जागा

Gmail Storage: प्रत्येक Google अकाउंटसोबत 15 GB मोफत स्टोरेज मिळते. मात्र, हे स्टोरेज Google Drive, Google Photos आणि Gmail या तिन्ही सेवांसाठी

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला