ISSF Junior World Championship. :आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा देदिप्यमान विजय

आयएसएसएफ (ISSF) ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६: भारताचा देदिप्यमान विजय; २४ पदकांसह अव्वल स्थान पटकावले 


भारतीय नेमबाजांनी ऐतिहासिक कामगिरी; २४ पदकांसह पटकावले अव्वल स्थान



नवी दिल्ली  : जर्मनीतील सुहल येथे पार पडलेल्या 'आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६' मध्ये भारतीय नेमबाजांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताने एकूण २४ पदके (7 Gold, 8 Silver, and 9 Bronze) जिंकून पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. भारतीय रायफल असोसिएशनने शुक्रवारी या विजयाची अधिकृत घोषणा केली.स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. सेजल कांबळेने १० मीटर एअर पिस्तूल ज्युनियर महिला गटात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले, तर हिमांशीने याच गटात कांस्यपदक जिंकले. सेजल, वंशिका चौधरी आणि नव्या बिश्नोई यांच्या त्रिकुटाने याच प्रकारच्या सांघिक गटातही सुवर्णपदकाची कमाई केली.




एनआरएआयचे(ARNI) अध्यक्ष कालिकेश नारायण सिंग देव यांनी या यशाचे कौतुक करताना म्हटले की, "सलग दोनदा विश्व अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थान मिळवणे ही एक मोठी उपलब्धी आहे. हे यश केवळ एका-दोन खेळाडूंचे नसून संपूर्ण टीमचे आहे. आपल्या तळागाळातील प्रशिक्षण कार्यक्रमांचे हे फलित आहे."एनआरएआयचे सरचिटणीस पवनकुमार सिंग यांनी सांगितले की, "सुहलसारख्या ठिकाणी खेळाडूंना मिळणारा अनुभव खूप महत्त्वाचा असतो. आमच्या ज्युनियर संघाने ज्या शांततेने आणि जिद्दीने या दबावाचा सामना केला, ते भविष्यातील भारतीय नेमबाजीसाठी अत्यंत आशादायक आहे."



स्पर्धेच्या शेवटच्या दिवसापर्यंत भारताने आपले वर्चस्व कायम राखत जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली आहे.



समीर: २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल (पुरुष ज्युनियर) – सुवर्णपदक.


रोहित कन्याण: ५० मीटर रायफल ३ पोझिशन (पुरुष ज्युनियर) – सुवर्णपदक.


प्रितम केंद्रे: १० मीटर एअर रायफल (पुरुष ज्युनियर) – सुवर्णपदक.


अभिनव देशवाल: २५ मीटर स्टँडर्ड पिस्तूल (पुरुष ज्युनियर) – सुवर्णपदक.


शंभवी श्रवण क्षीरसागर आणि अभिनव शॉ: १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक – सुवर्णपदक.


याशिवाय प्राची गायकवाड (रौप्य), अन्वी राठोड (कांस्य), शिवा नरवाल (रौप्य), युग प्रताप सिंग राठोड (कांस्य), शौर्य दिलीप भरणे (रौप्य), रिया दुग्गल (कांस्य), राज चंद्रा (कांस्य) आणि ऐश्वर्या रवीचंद्र बालेहसूर (रौप्य) यांनी वैयक्तिक गटात पदके जिंकून भारताच्या यशात मोठा वाटा उचलला.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा