"राहुल गांधी म्हणजे धूर निघालेलं रॉकेट"; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा घणाघात

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांना काँग्रेसकडून वारंवार लाँच करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी घणाघाती टीकाही केली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. गोरखपूरमध्ये जनसभेला संबोधित करताना त्यांनी ही टीका केली. यासाठी त्यांनी राहुल गांधी यांची तुलना दिवाळीतील रॉकेटशी केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, राहुल गांधी असं रॉकेट आहे, ज्याला आग लावूनही ते आकाशात उडत नाही. तसेच विझून जातं. राहुल गांधी यांची स्थिती तशी असल्याची टीका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. राहुल गांधी एक असं रॉकेट आहे, त्यातील दारू पहिलाच संपलीआहे आणि धूर निघाला आहे. काँग्रेस राहुल गांधी यांना राजकीयदृष्ट्या वारंवार लाँच करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी निराशा पडलेली आहे. हाच धागा पकडून योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

काय म्हणाले योगी आदित्यनाथ?


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, 'मला आश्चर्य वाटते की काँग्रेस किती वेळा राहुल गांधी यांना लाँच करणार आहे. दिवाळीत तुम्ही रॉकेट पाहात असाल. त्याला आग लावल्यानंतर आकाशाकडे पाहता. पण हे रॉकेट वर जात नाही आणि विझून जातं. ते रॉकेट राहुल गांधी आहे.' राहुल गांधींवर टीका करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राजकीय प्रवासावर कटाक्ष टाकत निशाणा साधला. राहुल गांधी 2004 मध्ये खासदार झाले. 2007 मध्ये काँग्रेस महासचिव, 2013 मध्ये काँग्रेस उपाध्यक्ष आणि 2017 मध्ये काँग्रेस अध्यक्ष झाले. यानंतरही स्वत:ची छाप एक नेता म्हणून सोडू शकले नाहीत. यावेळी त्यांनी 2019 मध्ये अमेठी लोकसभा पराभवाचा उल्लेखही केला.





मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं की, काँग्रेस वेगवेगळ्या कॅम्पेनच्या माध्यमातून राहुल गांधींना लाँच करत आहे. कधी भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा वगैरे.. पण काँग्रेसचे सर्व प्रयत्न फेल गेले आहेत. इतकंच योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, राहुल गांधी आता 56 वर्षांचे आहेत. अजूनही त्यांना एक युवा नेता म्हणून सादर केलं जातं. पण आता हे रॉकेट कधीच उड्डाण घेऊ शकणार नाही.
Comments
Add Comment

ईडीचा दणका! केरळ ते तामिळनाडू 11 ठिकाणी धाडी, 'आप' आमदाराच्या घरीही झाडाझडती

नवी दिल्ली: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लाँडरिंग प्रकरणाविरोधात आक्रमक पावले उचलत

Ramdas Athawale: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं राहुल गांधींवर टीकास्त्र

केंद्र सरकारमधील घटकपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय

हरियाणात सरकारी नोकरीचे नियम बदलले; आता फक्त भारतीय नागरिकांनाच मिळणार प्राधान्य!

चंदीगड: हरियाणा सरकारकडून सरकारी नोकरीच्या पात्रतेसंदर्भात एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Agniveer Service Extension: अग्निवीरांसाठी गुड न्यूज! सैन्यातील सेवा काळ 4 वरून 6 वर्षे होणार?

नवी दिल्ली: भारतीय सेनेमध्ये नोकरी करणाऱ्या तरूणांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने अग्निवीर

Congress MP Viral Video: श्यामकुमार हे वागणं बरं न्हवं...! काँग्रेस खासदाराने महिला खासदाराला मारली चापट; व्हिडिओ वायरल

दिल्लीत १ नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने रामलीला मैदानावर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस

Bengaluru Gas Cylinder Fire : ...आणि अवघ्या काही सेकंदांत सिलिंडरने पेट घेतला, एक चूक महागात पडली, डिलिव्हरी कर्मचारी थोडक्यात बचावला

Bengaluru Gas Cylinder Fire: बंगळूरच्या मल्लेश्वरम परिसरात गॅस सिलिंडरची डिलिव्हरी सुरू असताना अचानक आग लागल्याची घटना घडली.