Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुंबई आणि नागपूरमधील महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे दोन्ही शहरांतील प्रवाशांना भविष्यात मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.



मुंबईमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतूला (Swatantryaveer Savarkar Sea Link) वांद्रे किल्ला परिसराशी जोडण्यासाठी सुमारे ३.५५ किलोमीटर लांबीचा नवीन कनेक्टर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १,७२२.४० कोटी रुपयांचा खर्च होणार असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत त्याची अंमलबजावणी केली जाईल. हा कनेक्टर तयार झाल्यानंतर सध्या २० ते ४५ मिनिटे लागणारा प्रवास अवघ्या १० मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक सोयीचा होईल.


दुसरीकडे, नागपूर मेट्रो रेल टप्पा-२ अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहर या मार्गावर १.४० किलोमीटर लांबीची उन्नत मेट्रो मार्गिका उभारण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. या मार्गावर एक नवीन मेट्रो स्थानक उभारण्यात येणार असून या प्रकल्पासाठी सुमारे ३१०.३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामाची जबाबदारी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) यांच्याकडे असणार आहे.



नागपूर मेट्रो विस्तार प्रकल्पाला केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबई आणि नागपूरमधील वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होईल. तसेच नागरिकांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी करण्याच्या दृष्टीने हे दोन्ही प्रकल्प महत्त्वाचे मानले जात आहेत.


Comments
Add Comment

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी