Malegaon : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेसाठी मालेगाव सज्ज; २८ जूनला १.०९ लाख बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस

Malegaon : देशाचा पोलिओमुक्त दर्जा कायम राखण्याच्या उद्देशाने मालेगाव महानगरपालिका (Malegaon Municipal Corporation) सज्ज झाली आहे. २८ जून रोजी मालेगाव महानगरपालिका राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम (National Pulse Polio Immunization Campaign) राबविणार आहे. या मोहिमेत जन्मापासून ते पाच वर्षांपर्यंतच्या १ लाख ९ हजार ४०४ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.


पोलिओ हा मुलांमध्ये कायमस्वरूपी अपंगत्व निर्माण करणारा गंभीर आजार असून, त्यावर प्रभावी उपचार नाहीत. त्यामुळे प्रतिबंधक लसीकरण हाच सर्वात सुरक्षित उपाय आहे. या कारणामुळे नुकत्याच जन्माला आलेल्या बाळापासून ते ५ वर्षांपर्यंतच्या प्रत्येक लहान मुलाला पोलिओचे दोन थेंब देणे पालकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे यासाठी मुलांच्या आरोग्यासाठी महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून सर्व स्तरांवर अत्यंत काटेकोर आणि चोख नियोजन केले जात आहे.



शहरात ५१८ पोलिओ बूथ


या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी संपूर्ण मालेगाव शहरात विविध ठिकाणी ५१८ पोलिओ बूथ उभारण्यात आले आहेत. तसेच, शहराच्या प्रत्येक भागात पोहोचण्यासाठी ३८५ विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मोहिमेत मनपाचे आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि विविध सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.



प्रत्येक बालकाचे लसीकरण होणार


दुर्गम भाग, झोपडपट्ट्या, स्थलांतरित कुटुंबे आणि बांधकाम सुरू असलेल्या परिसरातील बालकांपर्यंतही लसीकरण पोहोचावे, यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. ​रविवारच्या मुख्य मोहिमेदरम्यान जी बालके काही कारणास्तव पोलिओ बूथवर येऊ शकणार नाहीत किंवा डोस घेण्यापासून वंचित राहतील, त्यांच्यासाठी मनपा आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. जि बालके काही कारणास्तव याठिकाणी येऊन शकणार त्यांच्या घरी आरोग्य विभाग पुढील काही दिवस विशेष घरभेट मोहीम राबवली जाणार आहे. शहरात एकही बालक या जीवनरक्षक डोसपासून वंचित राहणार नाही, याची संपूर्ण खबरदारी मनपा प्रशासनाकडून घेतली जाणार आहे.



कधी आणि कुठे होणार लसीकरण ?


कोणतेही बालक पोलिओच्या धोक्यापासून असुरक्षित राहू नये, यासाठी मालेगाव शहरातील सर्व पालकांनी रविवार, २८ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत आपल्या पाल्यांना जवळच्या पोलिओ बूथवर घेऊन जावे आणि डोस पाजून आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन महापौर नसरीन बानो शेख (Mayor Nasreen Bano Sheikh) ,आयुक्त रवींद्र जाधव व आरोग्य अधिकारी डॉ. जितेंद्र डोलारे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Gold Rate Today : आनंदाची बातमी ! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे भावही उतरले

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात गुरुवार, 15 ऑक्टोबर रोजी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून

Durga Puja 2026 : नवरात्रीचा उत्साह अन् दुर्गेचा जागर! जाणून घ्या दुर्गापूजेचे संपूर्ण वेळापत्रक, धार्मिक महत्त्व आणि मुख्य विधी

हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि मुख्य सणांपैकी एक असलेल्या दुर्गापूजा (Durga Puja) उत्सवाला सुरुवात होत आहे. वाईटावर

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

Nashik Crime : बसस्थानकातील चोऱ्यांचा पर्दाफाश ! 24 लाख 43 हजारांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त ; आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Nashik Crime : नाशिक शहरातील बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हेशाखा युनिट क्रमांक १च्या पथकाने

‘शिळ्या कढीला ऊत आणू नका!’ आमदार विक्रम पाचपुतेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा...

पुणे : “सुषमाताई अंधारे यांनी मला अभ्यासू आमदार असल्याचे मान्य केले, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो.