Minister Gulabrao Patil : एकनाथ शिंदेंनी दाढीवर हात फिरवला की 'उबाठा'चे १४ आमदार फुटतील !

 मंत्री गुलाबराव पाटील यांचा दावा; आवाजात सुधारणा करण्याचा आदित्य ठाकरेंना सल्ला


मुंबई : 'ऑपरेशन टायगर २.०' अंतर्गत उबाठा गटाचे सहा खासदार फुटल्यानंतर आता 'ऑपरेशन टायगर ३.०' अंतर्गत १२ आमदार फुटतील, असा दावा शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. "खासदार तर फक्त सुरुवात होती, आता 'उबाठा' गटाचे १४ हून अधिक आमदार लवकरच शिवसेनेत दाखल होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde) फार काही बोलत नाहीत, त्यांनी फक्त आपल्या दाढीवर हात फिरवला की 'ऑपरेशन टायगर ३.०' यशस्वी होईल," असे गुलाबराव म्हणाले.




फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या दौऱ्यांवर खोचक टोला लगावताना गुलाबराव पाटील म्हणाले, "दौरे केलेच पाहिजेत, त्याशिवाय राजकारणात काम होत नाही. पण आता मुलाला (आदित्य ठाकरे) जमत नाही, म्हणून बिचाऱ्या बापाने (Uddhav Thackeray) तरी बाहेर पडायला हवे. रात्री दोन-दोन वाजेपर्यंत मैदानात उतरून काम करणारा आणि सतत जनतेत फिरणारा नेता म्हणून आज एकनाथ शिंदेंचे नाव आहे. म्हणूनच ते आज लाडक्या बहिणींच्या, भावांच्या, शेतकऱ्यांच्या आणि वारकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत."या वेळी त्यांनी 'ऑपरेशन ३.०' वरून टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंची नक्कल केली. "अरे राजा, आमच्यावर टीका करण्यापूर्वी आधी स्वतःचा आवाज तर सुधरव! वाघासारखं बोलायला आणि आव्हान द्यायला गुलाबराव पाटलांसारखा पहाडी आवाज लागतो," असा टोमणा त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.







खासदार संजय दीना पाटलांचे कान टोचले


शिवसेना खासदार संजय दीना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी पत्रकारांना पोलिसांसमोर जाहीर शिवीगाळ व दमदाटी केल्याच्या प्रकरणावर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. पाटील म्हणाले, "लोकशाहीत पत्रकार हा चौथा स्तंभ आणि समाजाचा आरसा आहे. आपण कधीही आरशाला दगड मारू नये. राजकारणात वादविवाद, मतभेद होत असतात, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही शिवीगाळ आणि मारण्याची भाषा करावी. संजय दीना पाटील हे आमचे बंधू आहेत, त्यांनी यापुढे अशी चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. चूक झाली असेल, तर पत्रकारांना 'सॉरी' म्हणायला काय हरकत आहे?"

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण