Deputy Chief Minister Sunetra Ajit Pawar : श्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी शासन सकारात्मक;

पुणे : उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज श्रीक्षेत्र आळंदी येथे भेट देऊन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माऊलींच्या चरणी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीचे आणि सर्वांगिण विकासाचे साकडे घातले.



दर्शनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन संस्थानच्या विविध कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी विश्वस्तांनी श्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासंदर्भातील विविध प्रस्ताव, भाविकांसाठी आवश्यक सुविधा, पायाभूत विकासकामे तसेच संस्थानसमोरील विविध प्रलंबित प्रश्न मांडले. या संदर्भातील सविस्तर निवेदनही संस्थानच्यावतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सादर करण्यात आले.




निवेदनातील मागण्या आणि विविध विषयांवर शासनस्तरावर सकारात्मक विचार करण्यात येईल. संबंधित विभागांशी समन्वय साधून योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिली. श्रीक्षेत्र आळंदी हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून येथे येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर 'दर्शन बारी' चा विषय मागील १२ वर्षापासून प्रलंबित आहे तो लवकर मार्गी लावण्याबाबत ग्वाही दिली.

यावेळी परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे,आमदार दिलीप वळसे पाटील,माजी आमदार दिलीप मोहिते,आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत कुर्हाडे तसेच आजी-माजी पदाधिकारी, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य कबीर लोंढे, पुरुषोत्तम पाटील, ॲड रोहिणी पवार, वारकरी संप्रदायातील मान्यवर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण