Road Development : ३० ते ४० मिनिटांचा प्रवास आता अवघ्या १५ मिनिटात होणार; कल्याण, शिळफाटा

मुंबई : मुंबईतीळ अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. मात्र आता कल्याण मधील शिळफाटा परिसरातून दररोज जे जीवघेण्या ट्रॅफिक मधून प्रवास करणाऱ्याना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कल्याण शिळफाट्यावरील प्रवास मात्र आता अवघ्या १५ मिनिटात होणार आहे. ज्याप्रवासाला आधी ३० ते ४० मिनिटे लागायची तो आता काही मिनिटात होणारअसल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदच वातावरण आहे. परिसरातील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा लवकरच पूर्णत्वास येणार आहे.



फक्त कल्याण मध्येच नाही तर आणखी काही ठिकाणी

नवी मुंबई मधील ऐरोली- काटई(Airoli-Katai) नाका उन्नत मार्ग प्रकल्पाचे पहिला आणि दुसरा टप्पा हा अंतिम टप्प्यात आलेला असून लवकरच हे वाहतुकीसाठी सुरु करण्यात येणार आहेत असे एमएमआरडीएने सांगितले आहे. यामुळे नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि आसपासच्या भागातील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.



साधारण 12.71 किलोमीटर लांबीचा या उन्नत मार्ग खरं तर मुंबई महानगरातील महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक मानला जातोय. हा मार्ग सुरु होताच ऐरोली ते डोंबिवली दरम्यानचे अंतर 10 किलोमीटरने कमी होईल. महत्त्वाचे म्हणजे 30 ते 45 मिनिटांचा प्रवासाचा वेळ वाचून तो नवी मुंबई ते डोंबिवली शहर(Navi Mumbai to Dombivli) हे अंतर फक्त 15 मिनिटांत पार करता येणार आहे. या प्रकल्पातील ठाणे-बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग(Thane-Belapur Road to National Highway) 4 या 3.45 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे अधिक काम 92 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे तर दुसरीकडे ऐरोली ते ठाणे-बेलापूर रोड 2.57 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही पूर्ण झालेले आहे.



खासदार डॉ.श्रीकांत शिंदे(Dr. Shrikant Shinde) यांनी या महत्त्वाच्या प्रकल्पाला गती मिळावी म्हणून सातत्याने जात पाठपुरावाही केला होता. शिवाय अनेक वेळा याबाबत बैठका, प्रत्यक्ष जात पाहणी शिवाय संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या होता. त्यामुळे या प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्यात यश आले. या दोन्ही टप्प्यांचे उद्घाटन हे जुलै महिन्यात एकाच वेळी करुन वाहतूकीसाठी खुले करण्याचा विचार सुरु आहे. हा मार्ग सुरु होताच महापे, शिळफाटा, कल्याण फाटा, ठाणे-बेलापूर या सर्व मार्गावरील वाहतूक वेगवान होईल.
Comments
Add Comment

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

Thane Fire News : ठाणे हादरले! दिवा-शिल रोडवरील व्यावसायिक संकुलात भीषण आग; चार गोदामे जळून खाक, मोठी जीवितहानी टळली

ठाणे : ठाण्यातील दिवा-शिल रोड परिसरामध्ये गुरुवारी सकाळी एक अत्यंत भीषण आणि खळबळजनक आगीची घटना घडली. एका

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून