Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान भूकंपाने हादरलं; 6.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे तीव्र धक्के...

नवी दिल्ली : भारताच्या सीमेलगत असलेला देश म्हणजे अफगाणिस्तान. शनिवारी सायंकाळी 7:04 वाजता अचानक 6.2 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप रिश्टर स्केलवर झाला. या भूकंपाचे धक्के फक्त अफगाणिस्तान नाही तर भारत सीमेजवळील जम्मू-काश्मीर आणि अनेक भागांत जाणवले. तसेच पाकिस्तान, चीन, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिझस्तान आणि तुर्कमेनिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.



भारतीय राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (National Centre for Seismology - NCS) माहितीनुसार


भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या ईशान्य भागातील कलाफगान (Kalafgan) शहरापासून सुमारे 81 किलोमीटर अंतरावर होता. हा भूकंप जमिनीखाली सुमारे 215 किलोमीटर खोलीवर झाला.भूकंपाची तीव्रता जास्त असल्याने अनेक देशांमध्ये त्याचे धक्के जाणवले. भारतात विशेषतः जम्मू-काश्मीर आणि दिल्ली-एनसीआर परिसरातील नागरिकांना काही काळ भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिक घराबाहेर पडले.



मात्र दरम्यान या भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी किंवा मालमत्तेच्या नुकसानीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.हिंदू कुश पर्वतरांग भारतीय आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सच्या संगमावर असल्याने या भागात सातत्याने भूकंपीय हालचाली होत असतात. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाचे भूकंप वारंवार होत असून हा प्रदेश जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण भागांपैकी एक मानला जातो.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे