Badminton Asia Junior Championships : कझाकिस्तानवर मात करत भारताची उपांत्यपूर्व फेरीत धडक

'बॅडमिंटन आशिया ज्युनिअर चॅम्पियनशिप'मध्ये भारतीय संघाची चमकदार कामगिरी

यात्सुशिरो (जपान):
जपानमध्ये सुरू असलेल्या 'बॅडमिंटन आशिया ज्युनिअर मिक्स्ड टीम चॅम्पियनशिप'मध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली आहे. शनिवारी झालेल्या 'गट सी'मधील सलामीच्या सामन्यात भारताने कझाकिस्तानचा २-० (५५-३१, ५५-२१) असा धुव्वा उडवत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. आता गटातील अव्वल स्थान ठरवण्यासाठी भारताचा सामना चायनीज तैपेईशी होणार आहे.




सामन्याची सुरुवात महिला दुहेरीत दुर्गा ईशा कांड्रपू आणि कीर्ती मंचला यांनी ११-५ असा विजय मिळवून दिली. त्यानंतर मिश्र दुहेरीत पुनीत सुरेश आणि दीप्ती राज अदिती यांनी अटीतटीच्या लढतीत ११-१० अशा फरकाने विजय मिळवत भारताची आघाडी २२-१५ अशी वाढवली. त्यानंतरच्या तीन श्रेणींमध्ये भारतीय खेळाडूंनी पूर्ण वर्चस्व राखत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये भारतीय खेळाडूंनी कमालीचे नियंत्रण राखत कझाकिस्तानच्या खेळाडूंना प्रत्येक सामन्यात ६ पेक्षा कमी गुणांवर रोखून सहज विजय मिळवला.
Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम