Car Accident : भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या गाडीचा भीषण अपघात ; थोडक्यात बचावले

सांगली : भाजपमधील सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ(Sudhir Gadgil) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. सुदैवाने आमदार सुधीर गाडगीळ यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र गाडीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. रत्नागिरी-नागपूर(Ratnagiri-Nagpur) राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.



कसा झाला अपघात ?



आमदार सुधीर गाडगीळ हे आपले स्वीय सहाय्यक, अंगरक्षक, फोटोग्राफर आणि वाहनचालक यांच्यासह चारचाकी वाहनातून उगार येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून परतत असताना, रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून अंकलीच्या दिशेने जात असताना 'वडडी आणि कृष्णा घाट' (Vaddadi and Krishna Ghat)रस्त्यादरम्यान हा अपघात झाला. ​कृष्णा घाट सर्व्हिस रोडजवळ अचानक एक दुचाकी वाहन आमदार गाडगीळ यांच्या कारसमोर आडवे आले. दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही वाहनांची धडक झाली. मात्र गाडीचे एअरबॅग वेळेत उघडल्यामुळे सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.



मोठा अनर्थ टळला


दोन्ही गाड्यांमध्ये धडक इतकी भीषण होती की कारमधील सुरक्षेसाठी असलेल्या एअरबॅग्ज तात्काळ उघडल्या. त्यामुळे आमदार गाडगीळ यांच्या हाताच्या बोटाला लागलेली किरकोळ दुखापत वगळता मोठा अनर्थ टळला आहे. कारमधील अंगरक्षक नागेश भोकरे, फोटोग्राफर विकास गुंडप आणि चालक गणपती दरेकर हे सर्वजण सुदैवाने सुरक्षित असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला असून, त्याला तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण