BMC Schools : जेम पोर्टलमुळे शालेय वस्तू खरेदीला विलंब नाही, महापालिका प्रशासनाने केली भूमिका स्पष्ट

वह्या, पुस्तकांच्या वजनानुसार मुलांना दप्तरे द्या


तब्बल दोन वर्षांतील ४३ कोटी रुपयांची झाली बचत


मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये (BMC Schools) देण्यात येणाऱ्ऱ्या शालेय वस्तूंच्या एकेत प्रस्तावांना स्थायी समितीमध्ये मंजुरी दिली जात असून शाळेच्या प्रवेशाला या वस्तू मुलांना देण्यात आल्या नाही. त्यामुळे या आपल्या हक्कापासून मुले वंचित राहिल्याचा आरोप विरोधकांनी करतानाच जेम पोर्टलमुळे हा विलंब झाल्याचाही आरोप केला. मात्र, हा विलंब जेम पोर्टलमुळे झालेला नसून नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, जेम पोर्टलमुळे महापालिकेचे दोन वर्षांत ४३ कोटी रुपयांची बचत झाली असल्याचा दावा भाजप मुंबई अध्यक्षांनी केला आहे.



मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांना दप्तरे (School Bag), टिफिन डबा (Tiffin) आणि बॉटल्स (Bottles) खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीपुढे मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजुरीला आला असता उबाठाच्या मिनाक्षी पाटणकर यांनी पहिल्या दिवशी मुले उत्साहात शाळेत पण यंदा आपण त्यांना पहिल्या दिवशी सर्व शालेय वस्तू देवू शकलो नाही, मग आपण या वस्तू कधीपर्यंत देणार आहात असा सवाल केला. तर अश्रफ आझमी यांनी मागील वेळेत ज्या कंपनीने दिलेली दप्तरे आपण प्रयोगशाळेत बाद ठरवली होती, त्याच कंपनीला काम दिले जात असल्याने याची चौकशी व्हावी अशी मागणी केली. तर डॉ. सईदा खान यांनी प्रत्येक दप्तराचे सॅम्पल टेस्ट व्हावे, तसेच शाळेतील सर्व जुनी साहित्य न वाटता ती बाद करण्यात यावी अशी सूचना केली. तर यशवंत किल्लेदार यांनी मुलांच्या वह्या, पुस्तकांच्या वजनानुसार दप्तरे बनवण्यात यावी.


तर पहिल्या दिवशी मुलांना वह्या,पुस्तके आणि दप्तरे घेवून जाण्याची आजवर सवय लागली होती, परंतु त्या मुलांना त्यांच्या हक्कापासून आपण वंचित ठेवले असा आरोप श्रध्दा जाधव यांनी केला आणि जेम पोर्टलमुळे हा विलंब झाला. तसेच याची अंदाजित रक्कम कोणत्या निकषावर बनवले आहे. यामिनी जाधव यांनी प्रत्येक वर्षी नवीन दप्तरे खरेदी करतात असे नाही, तर सुरुवातीला आपण जुनीच वापरत असतो,असे सांगत विरोधकांचा समाचार घेतला.



यावर शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी शालेय वस्तू वाटपाला विलंब यंदा नाही, प्रत्येक खरेदीच्या वर्षाला झालेला आहे. ऑगस्टपर्यंत आपण साहित्य देत होतो,असे सांगत यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचवला गेला. हा वाचवलेला पैस कंत्राटदारांच्या खिशात नाही तर मुलांच्या शिक्षणासाठीच खर्च केला जाईल असे सांगितले. तर जेम पोर्टलमुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपये वाचल्याचे ऍड नार्वेकर यांनी सांगितले


यावर उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रत्येक वस्तुंच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. तसेच यापूर्वीही झालेली आहे. मात्र, जेम पोर्टलवरून या खरेदीची प्रक्रिया केल्यामुळे याला विलंब झाला नसल्याचे स्पष्ट केले.



दोन वर्षांत ४३ कोटी रुपयांची बचत, अमित साटम


मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना दरवर्षी २७ शैक्षणिक वस्तुंचे मोफत वाटप केले जाते. या वस्तुंची खरेदी पहिल्यांदाच केंद्र सरकारच्या ‘जेम पोर्टल’वरुन (गव्हर्नमेंट ईमार्केट प्लेस) करण्यात आली असून त्यामुळे महापालिकेची दोन वर्षात ४३ कोटी रुपयांची बचत झाली आहे, वर्ष २०२६-२८ साठी या शालेय वस्तुंची खरेदी ‘जेम पोर्टल’व्दारे करण्यात आली, त्याला २७८ कोटी ६ लाख रुपये खर्च आला. त्यापूर्वी हा खर्च ३१८ कोटी १५ लाख रुपये येत होता. ‘जेम पोर्टल’व्दारे खरेदी केल्यामुळे केवळ शालेय वस्तुंमध्ये दोन वर्षात पालिकेचे ४३ कोटी ५७ लाख रुपये वाचले असून १३ टक्के रकमेत बचत झाली आहे, असे आमदार अमित साटम यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

अमेरिकेचा हा बडा नेता थेट मुंबईच्या रस्त्यावर; गेटवे ऑफ इंडियावर मुख्यमंत्र्यांसोबत नेमकं काय घडलं?

मुंबईच्या ऐतिहासिक आणि डौलदार अशा गेटवे ऑफ इंडिया परिसरात आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अनपेक्षित भेटीने

Mumbai Fire: कुर्ल्यात 12 मजली इमारतीत अग्नितांडव! 5 वर्षांच्या चिमुकल्यासह 9 जखमी; रूग्णावर उपचार सुरू

मुंबई: मुंबईतील कुर्ल्यामध्ये ऐन दसऱ्याच्या दिवशी आगीची घटना घडली आहे. कुर्ला पश्चिमेतील कोहिनूर HDIL इमारतीमध्ये

मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्प कामांचा आयुक्तांनी घेतला आढावा, आयुक्तांनी पुन्हा प्रकल्प कामांची कमान घेतली हाती

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी कमी करून प्रवास अधिक सुगम आणि अखंड करण्याच्या उद्देशाने

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाच्या बोगदा खणन कामाला गती! ‘तुळशी’द्वारे १८३ मीटर खोदकाम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड

मुंबई महानगरपालिकेत ई-ऑफिस प्रणालीची पुन्हा अंमलबजावणी! तब्बल १४ हजार वापरकर्त्यांचा टप्प्याटप्प्याने करणार समावेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) संपूर्ण मुंबई महानगरपालिकेत ई-ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : पोलिसांच्या हाती मोठे पुरावे, लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध उघड होण्याची शक्यता!

मुंबई : मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफच्या घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणाचा कसून तपास करत असताना,