Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया गोयलच्या बचाव पक्षाने तिच्याविरोधात पोलिसांकडे कोणताही स्वतंत्र साक्षीदार किंवा ठोस पुरावा नसल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे राज्य सरकारने या संवेदनशील प्रकरणासाठी ज्येष्ठ सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. (Ketan Agrawal Murder Case)


तसेच केतन यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात (Fast-Track Court) चालवण्याचे निर्देशही दिले आहेत. (Ketan Agrawal Murder Case)


आरोपी सिया गोयलचे वकील ॲड. आशुतोष श्रीवास्तव यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सुरुवातीला या घटनेची नोंद अपघाती मृत्यू म्हणून झाली होती. नंतर पोलिसांनी हत्येच्या दिशेने तपास सुरू केला. मात्र, सियाविरोधात कोणताही स्वतंत्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा न्यायालयात टिकेल असा ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केला. (Ketan Agrawal Murder Case)



त्यांनी पुढे स्पष्ट केले की, भारतीय साक्ष अधिनियमातील तरतुदीनुसार पोलिसांसमोर दिलेला जबाब तो दंडाधिकाऱ्यासमोर (मॅजिस्ट्रेट) अधिकृतरीत्या नोंदवला गेला नाही, तर तो न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकत नाही. तसेच कोणत्याही आरोपीला स्वतःविरुद्ध जबाब देण्यासाठी सक्ती करता येत नाही. सिया गोयल तपासात पूर्ण सहकार्य करत असून 29 जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत न्यायालयीन कोठडीबाबत सुनावणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Ketan Agrawal Murder Case)


दरम्यान, केतन अग्रवाल यांच्या कुटुंबाने न्याय मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत प्रकरणासाठी अनुभवी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारने देशातील ज्येष्ठ वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या प्रकरणातील न्यायालयीन सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Ketan Agrawal Murder Case)

तपासादरम्यान पोलिसांनी आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. रेणू मित्तल आणि नरेंद्र मित्तल यांचा मुलगा यश मित्तल यांना लोणावळा पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, सिया गोयलच्या दोन जवळच्या मैत्रिणींनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. (Ketan Agrawal Murder Case)


तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सिया गोयल अनेक वैयक्तिक आणि महत्त्वाच्या बाबी या दोन्ही मैत्रिणींसोबत शेअर करत होती. त्यामुळे त्यांच्या जबाबातून तपासाला महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (Ketan Agrawal Murder Case)



या हत्याप्रकरणातील कोणताही दुवा दुर्लक्षित राहू नये, यासाठी पोलिस सर्व बाजूंनी तपास करत असून संबंधित सर्व व्यक्तींची सखोल चौकशी सुरू आहे. आगामी न्यायालयीन सुनावणी आणि तपासातील पुढील निष्कर्ष या प्रकरणाच्या दिशेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. (Ketan Agrawal Murder Case)

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी