Nashik Kumbh Mela : सिंहस्थासाठी महावितरणचा 'पॉवर प्लॅन' तयार; गोदापार्कसह चार ठिकाणी नवी उपकेंद्रे

Nashik Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक नगरीत येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय २४ तास अखंडित, सुरक्षित आणि उच्च दर्जाचा विद्युत पुरवठा करण्यासाठी महावितरण कार्यरत असून या भव्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्युत वितरणाच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण आणि सूक्ष्म नियोजनासाठी महावितरणचे संचालक (संचलन) धनंजय औंढेकर (Dhananjay Aundhekar) यांनी शुक्रवारी विद्युत भवन येथे आढावा बैठक घेतली आणि आज शनिवारी भद्रकाली येथे विद्युत उपकेंद्राच्या तसेच इतर कामाची पाहणी केली.



'अखंडित वीज पुरवठा' राखण्याचे उद्दिष्ट


कुंभमेळा काळात 'अखंडित वीज पुरवठा' ('Uninterrupted power supply') राखण्याचे उद्दिष्ट ठेवून सर्व विकास कामे गुणवत्तापूर्ण, तातडीने आणि कालबद्ध मर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांची उपस्थिती होती. कुंभमेळ्यासारख्या जागतिक दर्जाच्या सोहळ्यात वीज सेवा अखंडित ठेवणे ही महावितरणची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगत संचालक औंढेकर (Dhananjay Aundhekar)  यांनी प्रत्येक स्तरावर जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले. वीज पुरवठ्यात अचानक तांत्रिक बिघाड झाल्यास तात्काळ पूर्ववत करण्यासाठी सक्षम अत्याधुनिक पर्यायी यंत्रणा सज्ज ठेवली जाणार आहे.



गोदापार्कसह चार ठिकाणी नवी उपकेंद्रे


विद्युत यंत्रणा सक्षम करण्यासाठी गोदापार्क, भद्रकाली, नांदूर-मानूर आणि तळवाडे येथे नवीन ३३/११ केव्ही क्षमतेची अत्याधुनिक विद्युत उपकेंद्रे (Electrical Substations) उभारण्यात येत असून, सर्व कामांमध्ये गुणवत्ता व गतिमानता राखली जाणार आहे. या संपूर्ण परिसरातील वीज पुरवठ्यावर देखरेख ठेवण्यासाठी २४x७ विशेष नियंत्रण कक्ष आणि फिरते दुरुस्ती पथक कार्यरत केले जाणार आहे.ऐन गर्दीच्या काळात आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेले अतिरिक्त मनुष्यबळ आणि तांत्रिक साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.



सोबतच संचालक धनंजय औंढेकर यांनी नाशिक शहरातील भद्रकाली विद्युत उपकेंद्र, शाहीमार्ग व रामकुंड येथे भेट देत सुरू असलेल्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपस्थित अभियंत्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. या दौऱ्यात आणि बैठकीत अधीक्षक अभियंते देवेंद्र सायनेकर, अनिल थोरात, जगदीश इंगळे व रमेशकुमार पवार, तसेच कार्यकारी अभियंते योगेश निकम, नंदकिशोर काळे, चेतन वाडे, जगदीश जाधव व गोपाल पाटील यांच्यासह महावितरणचे इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने