Nashik : नवीन वीज जोडण्यांसाठी सुमारे ₹४,००० कोटींची तरतूद, उद्योगांसाठी नवीन वीज जोडणीचा खर्च महावितरण करणार

Nashik : राज्यात नवीन वीज जोडण्यांसाठी सुमारे ₹४,००० कोटींची तरतूद करण्यात आली असून, उद्योगांसाठी नवीन वीज जोडणीचा खर्च महावितरणमार्फत (Mahavitaran) केला जाणार आहे. तसेच 'वीज निरंतर' योजनेअंतर्गत आगामी कुंभमेळ्यापूर्वी (Nashik Kumbh Mela) नाशिक जिल्ह्यात ७,००० नवीन वितरण रोहित्रे ((Transformers)) बसविण्यात येणार असून, २० वर्षांहून अधिक जुनी रोहित्रे टप्प्याटप्प्याने बदलण्यात येणार आहेत, अशी माहिती महावितरणचे नवनियुक्त संचालक (संचालन) धनंजय औंढेकर (Dhananjay Aundhekar) यांनी दिली.




नवीन वीज जोडण्यांसाठी ४,००० कोटी


धनंजय औंढेकर यांनी महावितरणच्या आगामी योजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यात नवीन वीज जोडण्यांसाठी सुमारे ₹४,००० कोटींची तरतूद करण्यात आली असून, उद्योगांसाठी नवीन वीज जोडणीचा खर्च महावितरणमार्फत केला जाणार आहे.तसेच 'वीज निरंतर' योजनेअंतर्गत आगामी कुंभमेळ्यापूर्वी नाशिक जिल्ह्यात ७,००० नवीन वितरण रोहित्रे (Transformers) बसविण्यात येणार असून, २० वर्षांहून अधिक जुनी रोहित्रे (Old transformers) टप्प्याटप्प्याने बदलण्यात येणार आहेत.




महावितरणच्या सर्व सेवा पूर्णपणे ऑनलाइन


वीज चोरी रोखण्यासाठी मोबाईल एमएसईबी (MSEB) पथके कार्यरत करण्यात येणार असून, महावितरणच्या सर्व सेवा पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. ग्राहकांची वीजबिले मुख्यालयातून २४ तासांच्या आत तयार होऊन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज वापर, गळती, अनियमित वापर तसेच इतर महत्त्वाची माहिती ग्राहकांना थेट मोबाईलवर उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी (Dhananjay Aundhekar) स्पष्ट केले.



राज्यातील सध्याचा २७,००० मेगावॅटचा पीक वीजभार पुढील तीन वर्षांत १६,००० मेगावॅटपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे औंढेकर (Dhananjay Aundhekar)  यांनी सांगितले. त्यासाठी बॅटरी एनर्जी स्टोरेज (Battery Energy Storage) या आधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी सुरू असून, अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील भेंडा येथे २० मेगावॅट क्षमतेचा बॅटरी स्टोरेज प्रकल्प कार्यरत आहे. भविष्यात उपकेंद्र स्तरावरही ही प्रणाली सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास सुमारे दोन तास अखंड वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. असे त्यांनी सांगितले.


नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा), आयमा, महाराष्ट्र चेंबर, लघु उद्योग भारती, मास्मा आदी विविध औद्योगिक व व्यापारी संघटनांच्या (Industrial and trade associations) पदाधिकाऱ्यांकडून निमा हाऊस येथे महावितरणचे नवनियुक्त संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

Comments
Add Comment

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

CM Devendra Fadnavis : 'भाजप कार्यकर्त्यांनी फेक नरेटिव्हविरुद्ध लढण्यास सज्ज व्हावे'

पुणे : काँग्रेसने माओवादापासून स्फूर्ती घेत खोटेनाटे सांगत देशात अराजक माजवण्याचा विडा उचलला आहे.