Chhatrapati Shivaji Maharaj International Airport : बनावट सोन्याची बिस्किटं विक्री ; ९ जणांवर मोठी कारवाई

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावर बनावट सोन्याची बिस्किटं विक्री सुरू असल्याची माहिती महसूल गुप्तवार्ता संचालनालय अर्थात डीआरआय यांना समजली. (Operation Boolean Bust) मोहीम राबवून डीआरआयने आंतरराष्ट्रीय सोन्याच्या तस्करीच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.



९ जणांना अटक
डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबई विमानतळावरून(Mumbai Airport) सुरू असलेल्या या धंद्यावर पाळत ठेवली होती. तब्बल ३६ तास चाललेल्या या सलग कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी केवळ सोन्याची तस्करी करणाऱ्यांनाच पकडले नाही, तर आंतरराष्ट्रीय प्रवासी, विमानतळ कर्मचारी, हँडलर, मध्यस्थ आणि सोने वितळवणारे यांच्यातील संपूर्ण साखळीचा पर्दाफाश केला. या थरारक कारवाईत एका विमानतळ कर्मचाऱ्यासह एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे.



९ कोटीचे सोने जप्त
परदेशातून तस्करी करून आणलेले सोने या केंद्रात आणले जायचे. तिथे ते वितळवून त्याचे सोन्याच्या अधिकृत बिस्किटांमध्ये रूपांतर केले जात होते आणि त्यानंतर ते बाजारात विकले जायचे. या कारवाईदरम्यान डीआरआयने सुमारे ५.९८ किलो परदेशी बनावटीचे सोने जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत जवळपास ८.९५ कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण