Raigad Ropeway: रायगडावर जाणे होणार स्वस्त! रोपवेचे तिकीट ३५० रुपयांवरून ५०-१०० रुपयांपर्यंत कमी होणार

रायगड : किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने रायगडावर नवीन रोपवे उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यामुळे भविष्यात रोपवेने प्रवास करणे अधिक स्वस्त होणार आहे. सध्या प्रतिव्यक्ती सुमारे ३५० रुपये मोजावे लागणारे तिकीट नवीन व्यवस्थेनंतर ५० ते १०० रुपयांच्या दरम्यान ठेवण्याचा शासनाचा विचार आहे. या निर्णयामुळे रायगडावर जाणाऱ्या पर्यटकांना आणि शिवभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.



सध्या रायगडावरील खासगी रोपवेचे तिकीट अनेकांसाठी महाग असल्याने अनेक शिवभक्त गडावर पायी चढाई करतात. नवीन रोपवे सुरू झाल्यानंतर कमी खर्चात आणि कमी वेळेत गडावर पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह सर्व वयोगटातील पर्यटकांना याचा फायदा होईल.


महाराष्ट्र शासनाच्या या प्रकल्पाला पुरातत्त्व विभागाची मान्यता मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. नवीन अत्याधुनिक रोपवे सुरू झाल्यानंतर रायगडावरील पर्यटनाला चालना मिळेल, तसेच शिवभक्तांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.



रायगड विकास प्राधिकरणाच्या माहितीनुसार, सध्या खासगी रोपवेमार्फत प्रतिव्यक्ती सुमारे ३२५ रुपये भाडे आकारले जाते. याशिवाय गडावरील संवर्धनासाठी नेण्यात येणाऱ्या साहित्यावरही प्रतिकिलो शुल्क आकारले जात असल्याने विकासकामांचा खर्च वाढतो. नवीन सरकारी रोपवे सुरू झाल्यानंतर हा अतिरिक्त खर्च कमी होण्यास मदत होणार असून गडावरील संवर्धनाची कामेही अधिक वेगाने करता येतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी