Nashik TCS Case: नाशिक धर्मांतराप्रकरणी मोठा पुरावा समोर; गुगल सर्चमुळे ...

Nashik TCS Case: नाशिकच्या बहुराष्ट्रीय TCS कंपनीतील कथित धर्मांतर, अत्याचार आणि फसवणूक प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. अशातच आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. संशयितांनी पीडितेचे ‘हानिया’ असे नामांतर करण्यासाठी इंटरनेटवर नावाचा शोध घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवे धागेदोरे पोलिसांच्या हाती आले आहे.



बदललेल्या नावे नऊ हजार रुपयांची ‘जकात’


५ एप्रिल २०२५ म्हणजे एक वर्षापूर्वी अविवाहित तरुणीवर बलात्कारासह तिच्या धर्मांतराच्या प्रयत्नातील संशयितांनी पीडितेचे ‘हानिया’ असे नामांतर करण्यासाठी इंटरनेटवर नावाचा शोध घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवे धागेदोरे पोलिसांच्या हाती आले आहे. धक्कादायक म्हणजे त्यानंतर पीडितेची शैक्षणिक कागदपत्रे स्वतःकडे घेत त्यांनी नामांतर करून तिच्या बदललेल्या नावे नऊ हजार रुपयांची ‘जकात’ भरल्याचे स्पष्ट झाले. याबाबत न्यायालयात ‘एसआयटी’ने पुरावे दिले आहेत. त्यामुळे मंगळवारी (दि. ३०) निदा खान प्रकरणात नायायालयात काय निर्णय घेते हे पाहून महत्त्वाचं असेल.


देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यांत (Deolali Camp Police Station) अविवाहित पीडितेच्या फिर्यादीवरून निदा खान (Nida Khan) , दानिश शेख (Danish Shaikh) , तौसिफ अत्तार, यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तर छत्रपती संभाजीनगरातील (Chhatrapati Sambhajinagar) ‘एमआयएम’चा नगरसेवक मतीन पटेल(Matin Patel), घरमालक हानिफ शेख (Hanif Shaikh) यांना निदा खानला आश्रय उपलब्ध करून दिल्याने शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सहसंशयित केले आहे.



निदा खानच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश


मतीनने निदाला हानिफचे घर उपलब्ध करून देत आश्रय दिला होता. या गुन्ह्यातील संशयित दानिश शेख याला काही दिवसांपूर्वी मालेगावच्या ‘इस्लाम पार्टी’ने पाठींबा दिला होता. पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार आशिफ शेख (Asif Shaikh) यांनी दानिशला वकील तसेच इतर कायदेशीर मदत पुरवली आहे. दरम्यान २२ जून रोजी नाशिकरोड न्यायालयात झालेल्या सुनावणीत मध्यवर्ती कारागृहातून निदाचा वैद्यकीय अहवाल मागवणे, हा अर्ज निदाच्या वकिलांनी सादर केला. अर्ज मंजूर करून निदाच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश कारागृह प्रशासनासह पोलिसांना न्यायालयाने दिले आहेत. (Nashik TCS Case)



यापूर्वी एकदा निदाचा गर्भपात


दरम्यान, या प्रकरणातील संशयितांकडून वकील बदलण्याची प्रक्रिया सुरूच असून, निदा खान (Nida Khan) हिने आता ॲड. प्रतीक ताजनपुरे (Adv. Pratik Tajanpure) यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी संशयित दानिश शेख (Danish Shaikh) यानेही आपला वकील बदलला होता.ॲड. प्रतीक ताजनपुरे यांनी न्यायालयात बाजू मांडताना निदा खान ही गर्भवती असून तिच्या शरीरात लोहाची कमतरता असल्याचे सांगितले. त्यामुळे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली. या मागणीची दखल घेत न्यायालयाने पोलिस यंत्रणा तसेच मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला निदा खान हिची वैद्यकीय तपासणी करून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.यापूर्वी तिचा एकदा गर्भपात झाल्याने आता वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचा युक्तिवाद तिच्या वकिलांनी केला होता.



मंगळवारी जामिनावर सुनावणी


निदासह दानिश शेख व तौसिफ अत्तार यांचा मुक्काम नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central Jail) आहे. त्यांच्या जामिनाबाबत १९ जून रोजी सरकारी व विरोधी पक्षातर्फे जोरदार युक्तिवाद झाला होता. तीन तास चाललेल्या युक्तिवादानंतर निकालासाठी २५ जून रोजी अंतिम आदेशासाठी सुनावणी होती. मात्र, न्यायालयाच्या व्यस्ततेमुळे २५ जून रोजी जामिनाबाबत आदेश जारी झाले नव्हते. मंगळवारी (दि. ३०) पुन्हा आदेशासाठीची सुनावणी आहे. त्यांना जामीन मिळणार की फेटाळण्यात येणार याकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष आहे. याप्रकरणात तब्बल पंधराशे पानांचे दोषारोपपत्र दाखल आहे.

Comments
Add Comment

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी