Animal cremation facility at Malad : मालाड येथील प्राणी दहन सुविधा ११ जुलै २०२६ पर्यंत तात्पुरती बंद

- महालक्ष्मी आणि देवनार येथे पर्यायी सुविधा


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


लहान पाळीव व भटके प्राणी जसे की मांजर, ‌श्वान आदींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यासाठी सन्मानपूर्वक अंत्यविधीची सुविधा मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. पशुवैद्यकीय आरोग्य खाते आणि पी उत्तर विभाग कार्यालय यांच्यामार्फत ही सुविधा मालाड (पश्चिम) मध्ये एव्हरशाईन नगर येथे कार्यरत आहे. प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठीची दहन सुविधा वार्षिक नियोजित देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी २ जुलै ते ११ जुलै २०२६ या कालावधीत तात्पुरती बंद राहणार आहे. (Animal cremation facility at Malad)



दुरूस्ती आणि देखभालीच्या कालावधीत स्मशानभूमीतील यंत्रसामग्रीची स्वच्छता, तपासणी, इत्यादी तांत्रिक कामे केली जाणार आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. मृत पाळीव प्राणी आणि इतर प्राण्यांसाठी अंत्यसंस्कार सेवा विनाअडथळा सुरू राहावी, यासाठी महालक्ष्मी आणि देवनार या दोन्ही ठिकाणच्या सुविधा या कालावधीत उपलब्ध राहतील. देखभालीचे काम यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर, दिनांक १२ जुलै २०२६ पासून मालाड प्राणी दहन सुविधा पूर्ववत सुरू होण्याची अपेक्षा आहे. (Animal cremation facility at Malad)



मुंबई महानगरपालिका सर्व पशुपालक आणि नागरिकांना या काळात सहकार्य करावे. तसेच सार्वजनिक सुविधेच्या दृष्टीने या बदलाची नोंद घेऊन सर्वांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे. सदर बदलांमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महानगरपालिकेच्या आवश्यक त्या पर्यायी व्यवस्था वापराव्यात, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. (Animal cremation facility at Malad)

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.