Atacama Desert : लाखो रुपयांचे नवेकोरे कपडे थेट वाळवंटात फेकले जातात; कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Atacama Desert : जगभरात एका बाजूला फॅशनचा ट्रेंड दिवसेंदिवस बदलत आहे, तर दुसऱ्या बाजूला करोडो लोकांना अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडेही मिळत नाहीत. या दोन्ही टोकाच्या वास्तवाचं सर्वात धक्कादायक उदाहरण म्हणजे दक्षिण अमेरिकेतील चिली देशातील अटाकामा वाळवंट (Atacama Desert) . जगातील सर्वाधिक कोरड्या वाळवंटांपैकी एक असलेल्या या ठिकाणाला आता 'ब्रँडेड कपड्यांची स्मशानभूमी' म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे.



ब्रँडेड कपड्यांची स्मशानभूमी


इथे हजारो नव्हे, तर लाखो नवेकोरे आणि महागडे ब्रँडेड कपडे अक्षरशः टाकाऊ कचऱ्यासारखे फेकले जातात. विशेष म्हणजे, यापैकी अनेक कपडे एकदाही वापरलेले नसतात. ग्राहकांपर्यंत पोहोचण्याआधीच हे कपडे थेट वाळवंटात टाकले जातात. त्यामुळे अटाकामा वाळवंट हे जगभरातील फास्ट फॅशन उद्योगाचं सर्वात मोठं प्रतीक बनलं आहे. दरवर्षी चिलीतील इकीके (Iquique) बंदरातून तब्बल ५९ हजार टन कपडे अटाकामा वाळवंटात आणले जातात. यातील जवळपास ८५ टक्के कपडे कधीच बाजारात विकले जात नाहीत. विविध देशांतून आयात झालेला किंवा विक्री न झालेला स्टॉक थेट या वाळवंटात टाकून दिला जातो. त्यामुळे वर्षानुवर्षे या ठिकाणी कपड्यांचे प्रचंड ढीग साचले आहेत.


अटाकामामधील तीव्र उष्णता, कोरडे हवामान आणि वाऱ्यामुळे या कपड्यांच्या ढिगांना अनेकदा आग लागते. परिणामी लाखो-कोट्यवधी रुपयांचे ब्रँडेड कपडे जळून खाक होतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विषारी धूर व रासायनिक प्रदूषण निर्माण होतं. एकीकडे जगात आजही कोटयवधी लोकांकडे पुरेसे कपडे नाहीत. आफ्रिका, दक्षिण आशिया आणि दक्षिण-पूर्व आशियातील अनेक कुटुंबांना मुलांसाठी अन्न घ्यावं की कपडे किंवा शूज विकत घ्यावेत, असा प्रश्न पडतो.



नवीन कलेक्शनमुळे 'फास्ट फॅशन' उद्योग


यामागचं मुख्य कारण म्हणजे 'फास्ट फॅशन' उद्योग. आज अनेक मोठे ब्रँड प्रत्येक काही महिन्यांनी नवीन कलेक्शन बाजारात आणतात. ग्राहकांचं लक्ष वेधण्यासाठी सतत बदलणारे ट्रेंड तयार केले जातात. त्यामुळे जुन्या स्टॉकची मागणी कमी होते. विक्री न झालेला माल साठवून ठेवण्यापेक्षा तो नष्ट करणं किंवा फेकून देणं अनेक कंपन्यांना अधिक स्वस्त पडतं. चिलीमध्ये मोठ्या प्रमाणावर मोकळी जमीन आणि तुलनेने कमी खर्च असल्याने हे वाळवंट अशा टाकाऊ कपड्यांचं प्रमुख केंद्र बनलं आहे.


या फेकल्या जाणाऱ्या कपड्यांचा पर्यावरणावरही गंभीर परिणाम होत आहे. बहुतेक कपडे सिंथेटिक फायबरपासून तयार केलेले असल्याने ते सहज नष्ट होत नाहीत. त्यातून बाहेर पडणारी रसायने जमिनीमध्ये मिसळतात आणि माती व भूजल प्रदूषित करतात. हवामान बदलाच्या संकटात ही समस्या आणखी गंभीर बनत असल्याचा इशारा पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे.



भारतातही फास्ट फॅशनचा बाजार


अटाकामा वाळवंटातील कपड्यांचे ढीग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जगभरातून संताप व्यक्त करण्यात आला. अनेकांनी फॅशन उद्योगाच्या बेफिकिरीवर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी ग्राहकांनीही अनावश्यक खरेदी टाळण्याची गरज असल्याचं मत मांडलं. भारतामध्येही फास्ट फॅशनचा बाजार झपाट्याने विस्तारत आहे. ऑनलाइन शॉपिंग, स्वस्त ऑफर्स आणि सतत बदलणारे ट्रेंड यामुळे कपड्यांचा वापर आणि टाकाऊ कपड्यांचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी रिसायकलिंगला प्रोत्साहन, सेकंड-हँड कपड्यांच्या बाजाराला चालना, कपड्यांचा जबाबदारीने वापर आणि पर्यावरणाबाबत जनजागृती यावर भर देणं अत्यंत आवश्यक आहे.

Comments
Add Comment

Nashik : गणेशोत्सवापूर्वी नाशिक पोलिस ॲक्शन मोडमध्ये ! नाशिकमध्ये मुक्काम असलेल्या तडीपार गुन्हेगारांची ‘धरपकड’ मोहीम

Nashik : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक पोलीस ॲक्शन मोडमध्ये

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Apple iPhone18 : iPhone 18 Pro, Pro Maxच्या प्री-ऑर्डरला विलंब? १२ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू होण्याची शक्यता

मुंबई : ॲपलच्या आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Maxची उत्सुकता वाढली असून, या दोन्ही प्रीमियम मॉडेल्सच्या प्री-ऑर्डरची तारीख

Nashik Crime : समृद्धी महामार्गावरील दरोड्याप्रकरणी सात जण ताब्यात, ५ फरार आरोपींचा शोध सुरू

Nashik Crime : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी