Nashik : टीसीएस प्रकरणी निदा खानच्या जामीन अर्जावरती सहा जुलैला निर्णय

नाशिक : शहरभर गाजलेल्या बहुचर्चित टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपी दानिश खान(danish Khan) आणि निदा खान(NidaKhan) यांच्या जामीन अर्जावरील अंतिम सुनावणी आता ६ जुलै रोजी होणार आहे. यापूर्वी या प्रकरणात अनेकदा सुनावणीच्या तारखा पडल्या असून, अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने या प्रकरणातील सस्पेन्स आणखी वाढला आहे.



या संवेदनशील प्रकरणात सरकार पक्ष आणि बचाव पक्ष या दोन्ही बाजूंचा जोरदार युक्तिवाद आधीच पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता केवळ न्यायालयाचा अंतिम निर्णय येणे एवढीच प्रक्रिया बाकी आहे. मात्र, विविध तांत्रिक कारणांमुळे हा निर्णय जाहीर होऊ शकलेला नाही, परिणामी सुनावणीची तारीख वारंवार पुढे जात असल्याचे चित्र आहे.



दरम्यान आज न्यायालयाकडून अंतिम निर्णय येणे अपेक्षित होते. मात्र, न्यायालयाने आता पुढील अंतिम सुनावणी ६ जुलै रोजी निश्चित केली आहे. त्यामुळे संशयितांना जामीन मिळणार की त्यांचा मुक्काम जेलमध्येच राहणार, याकडे दोन्ही पक्षांसह संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता पाहता, जनतेमध्येही याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. ६ जुलै रोजी होणाऱ्या अंतिम सुनावणीत न्यायालयाच्या निर्णयाचा पुढचा अंक काय असेल, यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला