Special Intensive Revision of Electoral Rolls-2026 : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ अंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ दरम्यान गृहभेटी

- जिल्हा निवडणूक अधिकारी, महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे नागरिकांना आवाहन


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मुंबईतील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन-) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत, ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) गृहभेटी देणार आहेत. मतदारांनी संबंधित बीएलओ यांना आवश्यक माहिती उपलब्ध करुन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले आहे. (Special Intensive Revision of Electoral Rolls-2026)


मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन-एस आय आर) कार्यक्रम अंतर्गत, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) गृहभेटीदरम्यान मतदारांना त्यांचा गणना अर्ज देतील. या अर्जामध्ये आवश्यक माहिती भरून स्वाक्षरी करून त्याची एक प्रत बीएलओंना परत द्यावी लागेल. गृहभेटीपूर्वी शक्य झाल्यास मतदारांनी https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा EC Net App वर यापूर्वीच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन-) मधील आपला किंवा आई-वडीलांचा तपशील (नाव, मतदार संघ, मतदार यादी भाग क्रमांक., अनुक्रमांक शोधुन ठेवावा. परंतु, आपले किंवा आई- वडीलांचे नाव मागील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन-) मध्ये नसल्यास जन्माचा दाखला, पासपोर्ट, इयत्ता दहावीचे (मॅट्रिक) किंवा शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, सरकारी किंवा सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील कर्मचारी/निवृत्तीवेतन ओळखपत्र, राज्य / स्थानिक प्राधिकरणाची कुटुंब नोंदवही, शासनाने दिलेले जमीन किंवा घरवाटप प्रमाणपत्र, वन हक्क प्रमाणपत्र, राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा; बँक, टपाल कार्यालय, जीवन विमा महामंडळ किंवा सरकारने दिनांक १ जुलै १९८७ पूर्वी दिलेले ओळखपत्र / प्रमाणपत्र किंवा आधारकार्ड यापैकी कोणतेही एक कागदपत्र तयार ठेवावे. तसेच, आपले नुकतेच काढलेले पासपोर्ट आकारातील छायाचित्र सोबत ठेवावे, असेही प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे. (Special Intensive Revision of Electoral Rolls-2026)


मागील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन-) मध्ये आपला तपशील शोधण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी किंवा https://voters.eci.gov.in/searchInSIR/S2UA4DPDF-JK4QWODSE या लिंकवर क्लिक करावे. अधिक माहितीसाठी नजीकच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाशी किंवा १८०० २२ १८५० या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा व मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (Special Intensive Revision of Electoral Rolls-2026)

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर