Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यादरम्यान ग्रामीण हद्दीत कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ११ ते १८ जुलै या कालावधीत पालखी मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत. ( Pune Palkhi)


पुणे-सासवड (सासवड मुक्काम) : ११ जुलै रोजी पहाटे २ वाजल्यापासून १३ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुणेकडून सासवडकडे दिवे घाट व बोपदेव घाटमार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या मार्गावरील वाहने खडी मशीन चौक-कात्रज-कापूरहोळ मार्गे वळविण्यात येतील. सासवडकडून पुण्याकडे येणारी वाहतूक गराडे-खेड-शिवापूर मार्गे वळविण्यात आली आहे.



सासवड-जेजुरी (जेजुरी मुक्काम) आणि जेजुरी-वाल्हे (वाल्हे मुक्काम) : १३ जुलै रोजी पहाटे २ वाजल्यापासून १४ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुणे-सासवड-जेजुरी-वाल्हे-निरा तसेच निरा-पुणे मार्गावरील वाहतुकीसाठी झेंडेवाडी-पारगाव मेमाणे-सुपे–मोरगाव–निरा हा पर्यायी मार्ग वापरण्यात येणार आहे. (Pune Road)


वाल्हे-लोणंद (लोणंद मुक्काम) : १५ जुलै रोजी पहाटे २ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुणे-सासवड-जेजुरी-वाल्हे-निरा तसेच निरा-पुणे मार्गावरील वाहतूक सासवड-जेजुरी-मोरगाव या पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल.



लोणंद-फलटण मार्ग : १५ ते १८ जुलै या कालावधीत लोणंद-फलटणहून पुण्याकडे येणारी वाहतूक शिरवळमार्गे वळविण्यात येईल. तसेच पुणेहून फलटण व लोणंदकडे जाणाऱ्या वाहनांनाही शिरवळमार्गाचा वापर करावा लागणार आहे. पालखी सोहळ्यादरम्यान नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी