SIR in Mumbai : 'मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक'

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम अंतर्गत मुंबईत कार्यवाही सुरू आहे. या अनुषंगाने राबविण्यात येत असलेल्या विविध प्रक्रियांमध्ये राजकीय पक्षांनी सहकार्य करावे. तसेच, ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) गृहभेटीदरम्यान अधिकाधिक गणना होण्याच्या दृष्टिने सहाय्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले आहे.





मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम संदर्भात माहिती देण्याच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मंगळवारी ३० जून २०२६रोजी पार पडली. त्यावेळी भिडे बोलत होत्या.



उपमहापौर संजय घाडी, अतिरिक्त आयुक्त (शहर) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी (मुंबई शहर जिल्हा) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी आंचल गोयल, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार आदी यावेळी उपस्थित होते. तसेच, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.



जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे पुढे म्हणाल्या की, ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) गृहभेटी देणार आहेत. मतदारांनी संबंधित बीएलओ यांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये आणि कोणतीही अपात्र व्यक्ती समाविष्ट होऊ नये, हा या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश आहे. त्यामुळे, या प्रक्रियेसाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन भिडे यांनी केले आहे.



मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन -) कार्यक्रम अंतर्गत सुरू असलेली प्रक्रिया, वेळापत्रक आणि कार्यवाहीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या विविध मुद्द्यांवर चर्चाही करण्यात आली.

Comments
Add Comment

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी मुंबई : मुंबईत सध्या इंटरनेट,

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय