उपसभापतींच्या निवडीने सभागृहाची उच्च परंपरा कायम; अनिल परबांकडून सचिन अहिरांच्या अष्टपैलू कारकिर्दीचे कौतुक

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेना पक्षाचे आमदार सचिन अहिर (MLA Sachin Ahir) यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सभागृहात सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना आमदार अनिल परब यांनी आपल्या खास शैलीत मिश्कील टोलेबाजी करत सभागृहातील वातावरण हलके-फुलके केले. विधान परिषदेने आपली उच्च परंपरा आणि पावित्र्य कायम राखत उपसभापतींची बिनविरोध निवड केली, ही अत्यंत स्वागतार्ह बाब असल्याचे परब यांनी नमूद केले.



आपल्या भाषणात अनिल परब यांनी सचिन अहिर यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आणि जमिनीशी जोडलेल्या नेतृत्वाचा गौरव केला. "सचिन अहिर हे केवळ एक नेते नसून मंत्री, आमदार, सामाजिक, सांस्कृतिक आणि कामगार अशा विविध क्षेत्रांत दीर्घ अनुभव असणारे अष्टपैलू कार्यकर्ते आहेत. विविध जटिल प्रश्न हाताळण्याची त्यांची क्षमता दांडगी असून, त्यांच्या या सर्वपक्षीय संबंधांचा आणि प्रदीर्घ अनुभवाचा मोठा लाभ उपसभापती म्हणून संपूर्ण सभागृहाला होईल," असा विश्वास परब यांनी व्यक्त केला. यावेळी माजी उपसभापती दिवंगत वसंत डावखरे यांच्या आठवणींना उजाळा देत परब म्हणाले की, ज्याप्रमाणे डावखरे यांच्या दालनात सर्वच राजकीय पक्षांच्या सदस्यांना मुक्तपणे वावरता येत असे आणि तिथे राजकीय मतभेद विसरून संवाद साधला जात असे, तीच सर्वसमावेशक परंपरा सचिन अहिर पुढे चालवतील.(MLA Sachin Ahir)



सचिन अहिर आता एका महत्त्वाच्या घटनात्मक पदावर विराजमान झाले असल्याने, त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंना समान न्याय द्यावा. विशेषतः विरोधी पक्षाच्या सदस्यांना आपले प्रश्न मांडण्यासाठी पुरेशी संधी देऊन सभागृहाचे संतुलन राखावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. संपूर्ण सभागृहाने या बिनविरोध निवडीचे स्वागत केले असून सचिन अहिर यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.(MLA Sachin Ahir)

Comments
Add Comment

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन