IND vs ENG : इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मा रचणार इतिहास ! हार्दिकचा रेकॉर्ड मोडण्याच्या उंबरठ्यावर

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मालिका आज (१ जुलै) सुरू होत आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात, भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याला एक नवा विक्रम करण्याची संधी आहे. टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोडण्यासाठी अभिषेकला केवळ सहा षटकारांची गरज आहे.



सध्या इंग्लंड विरूद्धच्या सर्वाधिक षटकारांचा विक्रम हार्दिक पांड्याच्या नावावर आहे. पांड्याने इंग्लंडविरुद्ध खेळताना २७ षटकार मारले आहेत. मात्र, दुखापतीमुळे हार्दिक या मालिकेत सहभागी होत नसल्याने, अभिषेकला पांड्याचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे. अभिषेकने इंग्लंडविरुद्ध केवळ सहा सामन्यांमध्ये २२ षटकार मारले असून तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. यामुळे तो आपल्या पहिल्याच सामन्यात हा विक्रम मोडण्याची शक्यता वाढली आहे.



इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत हार्दिकनंतर अभिषेक दुसऱ्या स्थानावर असून विराट कोहली (18) आणि रोहित शर्मा (17) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. मात्र, विराट आणि रोहित (Virat and Rohit) यांनी टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने अभिषेकसमोर विक्रम मोडण्याची मोठी संधी आहे. दरम्यान, इंग्लंडविरुद्ध टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अजूनही विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 21 सामन्यांत 648 धावा केल्या आहेत. टीम इंडियाचा पहिला टी ट्वेंटी सामना भारतीय वेळेनुसार रात्री दहा वाजता खेळवला जाणार आहे. या सामन्यात अभिषेक शर्माच्या फलंदाजीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल.

Comments
Add Comment

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या