ईशान किशन टी-२० फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी

दुबई : भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनने आयसीसीच्या ताज्या पुरुष टी-२० फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले असून, त्याने सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकले आहे. बुधवारी जाहीर झालेल्या या क्रमवारीत किशन ८७६ गुणांसह पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या टी-२० विश्वचषकात किशनने ३१७ धावा करत सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. त्याचा स्ट्राईक रेट २०० च्या जवळ होता, ज्यामध्ये कोलंबो येथे पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'सामनावीर' कामगिरीचाही समावेश आहे. या यशासह विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा यांच्यानंतर टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचणारा तो चौथा भारतीय पुरुष फलंदाज ठरला आहे. मागील १२ महिने अभिषेक शर्मा (८६९ गुण) या यादीत अव्वल स्थानी होता, मात्र आता तो दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. पाकिस्तानचा साहिबजादा फरहान ८४८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.



भारताचा नवनियुक्त उपकर्णधार टिळक वर्मा (७४७ गुण) सहाव्या क्रमांकावर कायम आहे, तर माजी कर्णधार सूर्यकुमार यादव एका स्थानाने घसरून आठव्या क्रमांकावर आला आहे. वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक स्थान गमावले असून, ते अनुक्रमे तिसऱ्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. अफगाणिस्तानचा राशिद खान गोलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे.







कसोटी फलंदाजीच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेडने अव्वल स्थान पटकावले आहे, तर जो रूट तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल एका स्थानाने प्रगती करत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर यशस्वी जैस्वाल एका स्थानाने घसरून नवव्या क्रमांकावर आला आहे. कसोटी गोलंदाजीच्या क्रमवारीत भारताचा जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी कायम आहे.

Comments
Add Comment

India vs New Zealand Test : टीम इंडियाला मोठा धक्का ! आकाशदीप दुसऱ्या कसोटीतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी

India vs New Zealand Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची घसरगुंडी! 240 धावांची अजूनही पिछाडी

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या दिवशी

आकाशदीपचा क्राइस्टचर्चमध्ये 'पंजा'; न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांत आटोपला, ब्लंडेलचे शतक हुकले...

मुंबई: क्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात