Pravin Darekar : विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमताने निवड; 'विद्यार्थी चळवळीतून आलेला मित्र सर्वोच्च पदावर पोहोचल्याचा आनंद' – आ. प्रवीण दरेकर

मुंबई : विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir)यांची आज एकमताने निवड करण्यात आली. या ऐतिहासिक क्षणानंतर सभागृहात सादर झालेल्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना भारतीय जनता पक्षाचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी सचिन अहिर यांचे भरभरून कौतुक केले. "विद्यार्थी चळवळ आणि महाविद्यालयीन निवडणुकांपासून सुरू झालेला एक जुना, हुशार मित्र आज विधिमंडळाच्या सर्वोच्च सभागृहाच्या उपसभापती पदावर विराजमान होत आहे, हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे," अशा भावना आमदार दरेकर यांनी यावेळी व्यक्त केल्या.


सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्या बहुआयामी नेतृत्वाचा उल्लेख करताना आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, महाराष्ट्रात असे एकही क्षेत्र नाही, जिथे सचिन अहिर यांनी आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवला नाही. त्यांची विधिमंडळातील कारकीर्द अत्यंत संस्मरणीय राहिली असून, त्यांनी विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांचा गाढा अनुभव घेतला आहे. यापूर्वी म्हाडाचे अध्यक्ष आणि राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम संपूर्ण महाराष्ट्राने आणि विधिमंडळाने जवळून पाहिले आहे. क्रिकेट जगतात ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर अष्टपैलू आहे, तसेच राजकारणात सचिन अहिर हे एक अष्टपैलू नेते आणि तितकेच तत्पर कार्यकर्ते आहेत, अशा शब्दांत दरेकरांनी (Pravin Darekar) त्यांच्या कामाची तुलना केली. कामगार क्षेत्रासह सहकार, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांनी नेहमीच अग्रेसर भूमिका घेतली आहे.



आमदार दरेकर (Pravin Darekar) यांनी सचिन अहिर यांच्या राजकीय प्रगतीचा आणि अनुभवाचा गौरव करताना सांगितले की, सचिन अहिर यांनी नेहमीच योग्य वेळी योग्य निर्णय घेतले आहेत. त्यांना सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे, त्यांनी आजवर सोपवलेली प्रत्येक जबाबदारी अत्यंत लीलया आणि सक्षमपणे पार पाडली आहे. हाच दांडगा अनुभव त्यांना उपसभापती पदाचे कामकाज चालवताना नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



विधानपरिषदेच्या उपसभापती पदाचा एक मोठा आणि गौरवशाली इतिहास आहे. या सर्वोच्च पदावर आजवर अनेक मोठ्या नेत्यांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहास निर्माण केला आहे. नुकताच डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपसभापती म्हणून काम पाहताना महिलांचे प्रश्न आणि सामाजिक विषय अत्यंत संवेदनशीलतेने हाताळले. तशाच संवेदनशीलतेने आणि सर्वसमावेशकतेने सचिन अहिर हे देखील या पदाची गरिमा वाढवतील आणि संपूर्ण सभागृहाला न्याय देतील, अशी खात्री व्यक्त करत आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी त्यांना या पुढील यशस्वी कारकीर्दीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :