DCM Eknath Shinde : शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लवकरच विशेष बैठक; आमदार किरण सरनाईक शिवसेनेचे सहयोगी सदस्य

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; माळशिरसमधील अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश


मुंबई : शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर लवकरच विशेष बैठक घेऊन सकारात्मक निर्णय करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी दिली. याचवेळी अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार ॲड. किरण सरनाईक यांनी शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील अनेक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.


मुंबईतील पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुती सरकारने शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या असून उर्वरित प्रश्नांवरही लवकरच निर्णय घेतला जाईल. शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सरकार सकारात्मक असून अधिवेशनादरम्यान सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासोबत विशेष बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीतील मुद्दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडून आवश्यक निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.


आमदार किरण सरनाईक अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत आहेत. विविध बैठका, चर्चा आणि विधान परिषदेत त्यांनी शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी प्रभावीपणे आवाज उठवला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक प्रश्न मार्गी लागल्याचे शिंदे यांनी सांगितले.



महायुती सरकार राज्यातील शेतकरी, कामगार, शिक्षक, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. राज्याच्या विकासासाठी सरकार वेगाने निर्णय घेत असून त्याच विश्वासातून विविध क्षेत्रांतील लोकप्रतिनिधी शिवसेनेत सहभागी होत असल्याचा दावा त्यांनी केला.


आमदार किरण सरनाईक यांच्या पक्षप्रवेशाचा उल्लेख करताना शिंदे यांनी, "शिवसेनेत आधी एक सरनाईक होते, आता आणखी एक सरनाईक आले आहेत," असे मिश्कील वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना शिंदे म्हणाले, "आई-वडील जन्म देतात, पण संस्कार करण्याचे काम शिक्षक करतात. देशाचे आणि राज्याचे भविष्य घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे." यावेळी माळशिरस नगरपंचायतीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नगराध्यक्ष रघुनाथ चव्हाण आणि उबाठा गटाचे शहराध्यक्ष अशोक देशमुख यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.



तसेच आमदार किरण सरनाईक यांच्या पुढाकाराने डॉ. कृष्णा वक्ते, नरेश जाधव, पुंडलिक रहाटे, मायावती खंडारे, गजानन यन्नरवार, प्रमोद ढोले, प्रवीण परेकार, रमण टेकाम, महेंद्र गायकवाड, अजय थूल, प्रमोद गेडाम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.


मुंबईतील (Mumbai) मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील हमजा खान, अली खान, याया कुरेशी, उमेर खान, सोहेल सुभेदार, शामदेव कुमार आणि साहेब शेख यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नव्या सदस्यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाला आमदार ॲड. किरण सरनाईक यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध भागांतील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल