Udya Samant : शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीनिमित्त शहरांमध्ये ‘मराठी भाषा विकास केंद्र

आगामी एका महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र भाषा अधिकारी - मंत्री उदय सामंत


मुंबई: हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून राज्यातील नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या महत्त्वाच्या शहरांमध्ये 'मराठी भाषा विकास केंद्र' सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत (Udya Samant) यांनी केली. विधान परिषदेत नियम ९२ अन्वये झालेल्या अर्ध्या तासाच्या चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. या केंद्रांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर मराठी भाषेच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे.



प्रत्येक जिल्ह्यात 'जिल्हा भाषा अधिकारी' आणि गावनिहाय नेमणूक


मराठी भाषाविषयक कामांना अधिक गतिमान करण्यासाठी राज्य सरकारने प्रशासकीय पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे. आगामी एका महिन्यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र 'जिल्हा भाषा अधिकारी' नियुक्त केला जाईल. केवळ जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता गावनिहाय मराठी भाषा अधिकारी असावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून, राज्यात सुमारे १ ते दीड लाख गावनिहाय अधिकारी नेमण्याचे नियोजन शासनाने केले आहे. तसेच, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर 'उत्कृष्टता अध्ययन केंद्र' स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आल्याचेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.



लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी भाषा केंद्र


मराठीचा डंका जागतिक स्तरावर गाजवण्यासाठी शासनाने लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी भाषा केंद्र स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने ५ कोटी रुपये खर्चून लंडन येथील 'महाराष्ट्र मंडळाची' ऐतिहासिक इमारत खरेदी केली असून, पुढील दोन महिन्यांत हे आंतरराष्ट्रीय केंद्र पूर्णपणे कार्यान्वित होईल, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली. जागतिक स्तरावर मराठीचा प्रसार करण्यासाठी ७५ आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्यात येणार असून, त्यापैकी ३९ मंच आधीच यशस्वीरीत्या कार्यरत झाले आहेत. जपानमधील वर्ल्ड एक्स्पोच्या समारोप कार्यक्रमातही ‘जय जय महाराष्ट्र’ या गीताद्वारे मराठी संस्कृतीचे प्रभावी सादरीकरण झाल्याचा अभिमानास्पद उल्लेख त्यांनी केला.



साहित्य संमेलनांना प्रोत्साहन आणि मराठी भाषा भवन


केंद्राच्या निधीची वाट न पाहता राज्य सरकारने स्वबळावर विश्व मराठी संमेलनासह वारकरी, बाल, युवा, महिला आणि कामगार साहित्य संमेलनांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ व निळोबाराय यांचे विचार आणि अजरामर साहित्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने मोठा आर्थिक निधी उपलब्ध करून दिला आहे. मुंबईतील मुख्य 'मराठी भाषा भवनाचे' काम अत्यंत वेगाने सुरू असून ते डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे नियोजन आहे. यासोबतच, ऐरोली येथे ३४ कोटी रुपये खर्चून भाषा भवनाचे अत्याधुनिक उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. या सकारात्मक चर्चेत आमदार उमा खापरे, ज. मो. अभ्यंकर, अमित गोरखे आणि मनीषा कायंदे यांनीही सहभाग घेतला होता.

Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी