India vs Sri Lanka : भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार

नवी दिल्ली : भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिला सामना १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान गॉल येथे खेळला जाईल. दुसरा कसोटी सामना २३ ते २७ ऑगस्ट दरम्यान सिंहलीज स्पोर्ट्स(Sinhalese Sports)क्लबमध्ये खेळला जाईल. २०२५-२७ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारतीय संघासाठी ही एक महत्त्वपूर्ण मालिका आहे.



भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी सामना खेळून जिंकला आहे. भारताची अलीकडील कसोटी कामगिरी खराब राहिली आहे. यामुळेच संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, श्रीलंका भारतापेक्षा एक स्थान खाली सहाव्या क्रमांकावर आहे. २०२७ मध्ये डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला आपले उर्वरित बहुतेक कसोटी सामने जिंकावे लागतील.


भारत २०१७ नंतर प्रथमच कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. यापूर्वी, दोन्ही क्रिकेट मंडळांनी या दौऱ्यात तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश करण्याच्या शक्यतेवर चर्चा केली होती. पण टी२०(T20) आंतरराष्ट्रीय मालिकेचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे, सध्या केवळ दोन कसोटी सामन्यांची मालिकाच निश्चित मानली जात आहे.



आतापर्यंत दोन्ही संघ ४६ कसोटी सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. यापैकी भारताने २२ कसोटी सामने जिंकले आहेत, तर सात सामने अनिर्णित राहिले आहेत. १७ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. भारत २०१७ नंतर प्रथमच कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. यापूर्वी, दोन्ही क्रिकेट मंडळांनी या दौऱ्यात तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश करण्याच्या शक्यतेवर चर्चा केली होती. या फॉरमॅटमध्ये दोन्ही संघ शेवटचे २०२१ - २२ मध्ये एकमेकांसमोर आले होते. भारताने श्रीलंकेला २-० ने पराभूत केले होते. भारताने श्रीलंकेविरुद्ध सलग पाच कसोटी मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळे, भारतीय संघ विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आ

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून