Horrific bus accident : रत्नागिरीत दोन बसेसची समोरासमोर धडक; १५ विद्यार्थी जखमी

रत्नागिरी: रत्नागिरीतील मिरजोळे-उक्षी मार्गावर गुरुवारी सकाळी दोन बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात पटवर्धन हायस्कूल आणि महाविद्यालयातील १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एका बस चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.



नेमकी घटना काय?


गुरुवारी सकाळी पावणेसात ते सातच्या सुमारास हा अपघात फणसवळे (पवार कोंड) परिसरात घडला. भावे आडोम येथून विद्यार्थ्यांना घेऊन एक बस रत्नागिरीच्या दिशेने येत होती. याच दरम्यान समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसशी तिची समोरासमोर भीषण धडक झाली. धडक इतकी तीव्र होती की बसमधील विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आणि एकच आरडाओरड झाली.



ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मोठे संकट टळले


अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बसमधील अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. या मदतीमुळे जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करणे शक्य झाले. घटनेची माहिती मिळताच पालकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.



विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर


रुग्णालयात सध्या जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, अपघातात एका बस चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.




सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर


विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसच्या सुरक्षेचा प्रश्न या अपघातामुळे पुन्हा एकदा गंभीर चर्चेत आला आहे. अरुंद रस्ते आणि वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत निष्काळजीपणा यांमुळे विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतणाऱ्या घटना वाढत आहेत. प्रशासनाने या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन ठोस उपाययोजना करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण