Indian Armed Forces: संरक्षण दलांची युद्धसज्जता वाढवण्यासाठी 52,000 कोटी रुपयांच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी


नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 03 जुलै 2026 रोजी झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) संरक्षण दलांच्या विविध खरेदी प्रस्तावांसाठी सुमारे 52,000 कोटी रुपयांच्या 'आवश्यकतेच्या मंजुरीला' (AoN) म्हणजेच तत्वतः प्रशासकीय मंजुरी दिली आहे.


भारतीय लष्करासाठी, अँटी-अनमॅन्ड एरियल व्हेईकल (UAV) इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टम 'आकाश तरंग', मॅन पोर्टेबल अँटी-टँक गाइडेड मिसाइल (MPATGM) सिस्टम, मीडियम रेंज सर्फेस-टू-एअर मिसाइल (MRSAM) वेपन सिस्टम, व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टम (V-SHORADS), रणगाड्यांसाठी ॲक्टिव्ह प्रोटेक्शन सिस्टम आणि जेट-आधारित कामिकाझे ड्रोन सिस्टमच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे.



'आकाश तरंग' लष्कराच्या तुकड्यांना ड्रोनविरोधी (anti-UAV) प्रभावी संरक्षण प्रदान करेल. मॅन पोर्टेबल अँटी-टँक गाइडेड मिसाइल (MPATGM) शत्रूच्या यांत्रिक आव्हानांचा सामना करण्यासाठी पायदळाची (Infantry) क्षमता अधिक मजबूत करेल. तर मीडियम रेंज सर्फेस-टू-एअर मिसाइल (MRSAM) यंत्रणा विविध प्रकारच्या हवाई धोक्यांपासून मध्यम पल्ल्याचे हवाई संरक्षण प्रदान करते.


मल्टी-स्पेक्ट्रल सेन्सिंग असलेले व्ही-शोराड्स यंत्रणा भारतीय लष्कराची प्रत्युत्तर देणाऱ्या-उपायांची लवचिकता आणि परिणामकारकता वाढवेल. ॲक्टिव्ह प्रोटेक्शन सिस्टम रणगाड्यांची संरक्षण प्रणाली सुधारण्यास आणि त्यांची रणांगणावरील टिकून राहण्याची क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त असेल. तर जेट-आधारित कामिकाझे ड्रोन अधिक संहारकक्षम आणि सुरक्षेसह उत्तम इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर क्षमता वृद्धिंगत करणारे आहेत. त्याच प्रकारे ते किफायतशीरही आहेत.



भारतीय नौदलासाठी, मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइन(MIGM), नेव्हल शिपबॉर्न अनमॅन्ड एरियल सिस्टम ची खरेदी आणि इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टमसाठी लँड बेस्ड टेस्टिंग फॅसिलिटी उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.


MIGM शत्रूच्या हालचालींवर मर्यादा आणेल. प्रगत सेन्सर्सनी सुसज्ज असलेली NSUAS यंत्रणा भारतीय नौदलाच्या सभोवतालच्या परिस्थितीबाबतच्या दक्षतेत वाढ करेल. तर LBTF यंत्रणा भारतीय नौदलाच्या जहाजांसाठी लागणाऱ्या मोटर्स आणि संबंधित प्रोपल्शन यंत्रणांच्या चाचणीची आवश्यकता पूर्ण करेल.


भारतीय हवाई दलासाठी, फिक्स्ड-विंग बेस्ड हाय अल्टिट्यूड सुडो सॅटेलाइट (FW-HAPS) आणि इतर प्रस्तावांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. FW-HAPS ही यंत्रणा भारतीय हवाई दलासाठी सातत्यपूर्ण गोपनीय माहिती गोळा करणे, पाळत ठेवणे आणि शोध घेणे, दूरसंचार तसेच रिमोट सेन्सिंगची कामे करेल.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि