Badminton Association of India : बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून '३x१५' स्कोअरिंग पद्धतीची अंमलबजावणी

नवी दिल्ली : भारतीय बॅडमिंटनपटूंना जागतिक स्तरावरील आगामी बदलांसाठी सज्ज करण्यासाठी, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने (Badminton Association of India) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जुलै २०२६ पासून देशांतर्गत स्पर्धांमध्ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची नवीन '३x१५' स्कोअरिंग पद्धत लागू केली जाणार आहे. याची सुरुवात ७ ते १४ जुलै २०२६ या काळात एर्नाकुलम (केरळ) येथे होणाऱ्या 'योनेक्स-सनराईज ऑल इंडिया सीनियर रँकिंग बॅडमिंटन टूर्नामेंट'पासून होईल.


बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने जानेवारी २०२७ पासून ही पद्धत जागतिक स्तरावर लागू करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्याआधीच भारतीय खेळाडूंना या नव्या स्वरूपाची सवय व्हावी आणि त्यांना तांत्रिक व शारीरिकदृष्ट्या तयार राहता यावे, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. ही नवीन पद्धत केवळ वरिष्ठ स्तरावरच नव्हे, तर झोनल चॅम्पियनशिप, रँकिंग टूर्नामेंट्स आणि नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये (अंडर-११ ते सिनियर आणि मास्टर्स/व्हेटरन्स) अनिवार्य असेल. यामुळे संपूर्ण भारतीय बॅडमिंटन इकोसिस्टममध्ये एकवाक्यता येईल. या निर्णयाबद्दल अधिक माहिती देताना बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस संजय मिश्रा म्हणाले, "बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया जानेवारी २०२७ पासून ही पद्धत लागू करणार आहे. खेळाडू, प्रशिक्षक आणि तांत्रिक अधिकारी यांना या बदलाची पूर्वतयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, म्हणून आम्ही त्याची लवकर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे सर्व वयोगटातील खेळाडूंना नवीन फॉरमॅटची सवय होईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संक्रमण अधिक सुलभ होईल." (Badminton New Rules)


या बदललेल्या स्वरूपामुळे खेळाची तीव्रता वाढणार असून, खेळाडूंना आता अधिक तांत्रिक अचूकता आणि त्वरित निर्णय घेण्याच्या क्षमतेवर भर द्यावा लागणार आहे.



नवीन पद्धतीचे स्वरूप:


स्कोअरिंग बदल: आता सामने 'बेस्ट ऑफ थ्री' फॉरमॅटमध्येच खेळले जातील, पण प्रत्येक गेम २१ ऐवजी १५ गुणांचा असेल.


निकाल: १४-१४ गुणांवर पोहोचल्यानंतर २ गुणांची आघाडी घेणे अनिवार्य असेल. तसेच, गुण २०-२० झाल्यानंतर पुढील गुण मिळवणारा खेळाडू विजेता ठरेल.


इंटरव्हल: खेळाडू किंवा जोडी ८ गुणांवर पोहोचल्यावर 'मिड-गेम इंटरव्हल' असेल. तिसऱ्या गेममध्ये साईड बदलण्यासाठी ६० सेकंदांचा ब्रेक मिळेल. दोन गेम्समधील १२ नो-सेकंदांचा ब्रेक कायम असेल.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून