Tukaram Mundhe : आता दुधात भेसळ करणारे रडारवर

अन्न आणि औषध प्रशासनाकडून नवी नियमावली; आयुक्त तुकाराम मुंढे यांची घोषणा


मुंबई (Mumbai) : हॉटेल व्यावसायिक, बेकरी आणि पनीर विक्रेत्यांनंतर आता राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा दूध सम्राटांकडे वळवला आहे. "ग्राहकांच्या ताटापर्यंत शुद्ध आणि सुरक्षित दूध पोहोचणे हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे. त्यामुळे दुधातील भेसळ आणि कृत्रिम दुधाचा काळाबाजार मुळापासून उपटून टाकण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण पुरवठा साखळीसाठी कठोर नियमावली जाहीर केली आहे. 'फार्म टू प्लेट' या तत्त्वानुसार दूध संकलन केंद्रापासून ते अगदी किरकोळ विक्रेत्यांपर्यंत सर्वांना या नियमांचे पालन करावे लागेल; अन्यथा परवाने (License) रद्द केले जातील," असा इशारा तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. या मोहिमेसाठी प्रशासनाने 'सेव्ह फूड, सेव्ह ड्रग' ही विशेष राज्यव्यापी मोहीम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.



गेल्या काही दिवसांत हॉटेल आणि बेकरी व्यवसायात आपल्या कारवाईचा धाक दाखवल्यानंतर मुंढे यांनी आता दूध क्षेत्रातील गैरव्यवहारांवर 'सर्जिकल स्ट्राईक' केला आहे. राज्यभर करण्यात आलेल्या तपासण्या आणि नमुन्यांच्या विश्लेषणातून दूध पुरवठा साखळीमध्ये काही अत्यंत गंभीर त्रुटी सातत्याने समोर आल्यानंतर हा सर्वंकष अनुपालन आदेश जारी करण्यात आला आहे. याविषयी मुंढे म्हणाले, "हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या तपासणीदरम्यान असे आढळून आले की, अनेक जण पेस्ट कंट्रोल केल्याचे सर्टिफिकेट दाखवतात, मात्र प्रत्यक्षात तिथे पेस्ट कंट्रोल केलेले नसते. अशा बोगसगिरी करणाऱ्या हॉटेल्सचे लायसन्स आम्ही तात्काळ रद्द केले आहे. त्यामुळे मला कागदी घोडे नकोत, प्रत्यक्ष काम न दिसल्यास दुकान किंवा व्यवसाय बंद पाडला जाईल," अशा शब्दांत त्यांनी मुजोर व्यावसायिकांना सुनावले.





एफडीएने केलेल्या निरीक्षणात दूध व्यवसायात काही गैरप्रकार उघडकीस आले आहेत. त्यानुसार, दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची भेसळ करणे. युरिया, डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, स्टार्च, ग्लुकोज आणि 'मेलामाइन' यांसारख्या घातक रसायनांचा वापर करून कृत्रिम (सिंथेटिक) दूध तयार करणे. 'मिल्क फॅट' आणि 'एसएनएफ'(SNF)च्या कायदेशीर मानकांचे उल्लंघन करणे. दूध टिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या शीतसाखळीचे पालन न करणे. विनापरवाना किंवा विनानोंदणी बेकायदेशीरपणे व्यवसाय करणे आणि चुकीचे लेबलिंग करून ग्राहकांची दिशाभूल करणे, असे मुढे म्हणाले.



संकलन ते विक्री साखळीतील सर्वांना ८ नियम बंधनकारक

या पार्श्वभूमीवर आयुक्त मुंढे यांनी दूध उत्पादक आणि वितरकांची बैठक घेऊन त्यांच्यासमोर सादरीकरण (प्रेझेंटेशन) केले. "आपल्या आहारात दूध हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात एकसमान सुरक्षा व्यवस्था असणे गरजेचे आहे. नवीन नियमावलीनुसार उत्पादकांपासून ते अंतिम विक्रेत्यांपर्यंत ८ प्रकारचे कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. दूध संकलन केंद्रे, शीतकरण (Coling) सेंटर्स, दुग्ध प्रक्रिया युनिट्स, वाहतूकदार, घाऊक आणि किरकोळ विक्रेते या सर्वांना हे नियम बंधनकारक राहतील," असे त्यांनी स्पष्ट केले. दूधासह पनीर, खवा, तूप, दही, लोणी, क्रीम, चीज, दूध पावडर आणि आईस्क्रीम यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांवरही ही नवी नियमावली लागू असणार आहे.

Comments
Add Comment

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी

Maharashtra weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, मुंबईत उकाडा वाढणार

मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे काही भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट

विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सहकार मंत्र्यांची बैठक, ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयासाठी सरकार प्रयत्नशील

मुंबई: राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी झेप; ह्युंदाई मोटर प्रकल्पाचे पुण्यात दिमाखात उद्घाटन, मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

पुणे :

Jayakumar Rawal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सोयाबीन, तूर, उडदाला किती मिळणार हमीभाव? 950 खरेदी केंद्रे सज्ज

मुंबई : केंद्र शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2026-27 मध्ये सोयाबीन, मूग, उडीद व तूर खरेदीसाठी