Ketan Agrawal Murder Case : केतनच्या हत्येचे गुढ उकलणार! सिया गोयलची होणार लाय डिटेक्टर टेस्ट

केतन अग्रवाल हत्याकांडात सिया गोयलची होणार लाय डिटेक्टर टेस्ट? पोलिसांनी तयार केली १८ प्रश्नांची यादी


 

पुणे : केतन अग्रवाल (Ketan Agrawal Murder) हत्याकांडाच्या तपासात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Chaudhary) यांची पोलिसांकडून चौकशी सुरू असली तरी दोघांकडून मिळणाऱ्या उत्तरांमध्ये विसंगती आढळत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपास अधिक स्पष्ट करण्यासाठी सिया गोयलची लाय डिटेक्टर टेस्ट (Lie Detectot Test) घेण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, या चाचणीसाठी पोलिसांनी संभाव्य १८ प्रश्नांची यादी तयार केली आहे. या प्रश्नांद्वारे केतन अग्रवालच्या मृत्यूपूर्वीच्या घडामोडी, सिया आणि चेतन यांच्यातील संपर्क तसेच कथित कटाचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या प्रश्नांमध्ये सियाची ओळख, केतन अग्रवालसोबतचा साखरपुडा, चेतन चौधरीसोबतचे संबंध, १८ जून रोजी लोहगड येथे उपस्थिती, केतनला लोहगडला बोलावण्यामागील कारण, चेतनसोबत आधीच योजना आखली होती का, तसेच घटनेनंतर कोणतेही चॅट, कॉल रेकॉर्ड किंवा डिजिटल पुरावे हटवले का, यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. (Lohgad)

याशिवाय, केतन अग्रवालला ढकलले होते का, त्याच्यावर इतर कोणी हल्ला करताना पाहिले का आणि त्याच्या मृत्यूबाबत अजून काही माहिती लपवली आहे का, असे प्रश्नही विचारले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.



दरम्यान, लाय डिटेक्टर टेस्ट घेण्यासाठी संबंधित न्यायालयाची परवानगी आणि आरोपीची संमती आवश्यक असते. या प्रक्रियेनंतरच चाचणी केली जाऊ शकते. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व पुरावे तपासल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

 

 

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी