Pratap Sarnaik : एसटी प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य

सोलापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने(ST)सवलतीच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC)अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 'लाडकी बहीण' योजनेतील महिलांसह सर्व सवलतधारक प्रवाशांनी पुढील २८ दिवसांत स्मार्ट कार्ड काढणे आवश्यक असून, १ ऑगस्टपासून एनसीएमसी कार्डशिवाय सवलतीच्या दरात प्रवास करता येणार नाही.



एसटीचा प्रवास अधिक स्मार्ट, डिजिटल आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. एनसीएमसी कार्डमुळे तिकीट वितरणाची प्रक्रिया जलद होणार असून, रोख व्यवहारातही घट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.महामंडळाने कार्ड नोंदणी प्रक्रिया सुलभ केली असून, अर्ज केल्यानंतर सुमारे ३० दिवसांत लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानंतर कार्ड ऑनलाइन रिचार्ज करून वापरता येणार असल्याने प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहेत.



महामंडळाच्या माहितीनुसार, सोलापूर शहर व जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे २ लाख ८९ हजार ३७१ प्रवाशांना एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विविध सवलत योजनांतील लाभार्थ्यांना या डिजिटल प्रणालीचा लाभ मिळणार आहे. परिवहन महामंडळ, ट्रॅव्हिक्स टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविण्यात येत असून, कॅशलेस आणि स्मार्ट प्रवासाच्या दिशेने एसटी महामंडळाचे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी