Devendra Fadnavis : हवामान विभागाचे अलर्ट पाहूनच घराबाहेर पडा!

मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन; कनेक्टिंग लिंकवरील खड्ड्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर


मुंबई : "राज्यात मुंबई महानगर प्रदेशासह (एमएमआर) ठाणे, रायगड, पालघर, पुणे, नाशिक आणि इतर भागात ६ जुलैपर्यंत अतिशय मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. सरासरीपेक्षा कितीतरी जास्त पाऊस होण्याची शक्यता असल्याने, नागरिकांनी हवामान विभागाचे 'अलर्ट' पाहूनच घराबाहेर पडावे आणि शक्यतो प्रवास टाळावा," असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. (Devendra Fadnavis)



पावसाची भीषणता लक्षात घेऊन अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी देण्यात आली असून, राज्य सरकारकडून नागरिकांना दर तीन तासांनी मोबाईलवर एसएमएसद्वारे अलर्ट पाठवले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपत्ती व्यवस्थापनाच्या सज्जतेबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, "एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रत्येक परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहेत. ज्या ज्या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत, त्या तात्काळ दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघात टाळण्यासाठी आम्ही सातत्याने सूचना देत आहोत, लोकांनी या अलर्ट्सचे तंतोतंत पालन करावे."कनेक्टिंग लिंकवर पडलेल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आणि समाजमाध्यमांवरून होणाऱ्या टीकेचा मुख्यमंत्र्यांनी चांगलाच समाचार घेतला. "कनेक्टिंग लिंकवर जिथे कनेक्टर आहे, तिथे केवळ दोन खड्डे पडले आहेत. मात्र, पूर्ण कनेक्टिंग लिंकवरच खड्डे पडल्याचा डांगोरा पिटणे चुकीचे आहे. काही लोकांना प्रत्येक गोष्टीचा बाऊ (Amplify) करण्यातच आनंद मिळतो," असा टोला त्यांनी लगावला.





वस्तुस्थिती काय?


 "कुठलेही मोठे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पहिल्या पावसात त्याची 'ड्युरॅबिलिटी टेस्ट'  (Durability Test) (टिकाऊपणाची चाचणी) होत असते. नवीन उड्डाणपुलावर जेव्हा 'मॅस्टिक डांबर' टाकले जाते, तेव्हा ते सुरुवातीला एका जागी जमा होते आणि नंतर सेटल होते. या इंजिनिअरिंगच्या गोष्टी आहेत. तथापि, 'निंदकाचे घर असावे शेजारी' या उक्तीप्रमाणे जर काही कमतरता समोर आणल्या असतील, तर एमएसआरडीसी योग्य काळजी घेऊन त्या नक्कीच रेक्टिफाय (दुरूस्त) करेल", असे मुख्यमंत्री म्हणाले. नकारात्मक राजकारण करणाऱ्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "देशातला सर्वात उंच पूल, देशातले सर्वात रुंद बोगदे आणि देशात पहिल्यांदाच धरणाच्या खालून बोगदा तयार करण्याचे ऐतिहासिक काम आपण करून दाखवले आहे. त्यामुळे निव्वळ टीका करण्यापूर्वी, हे अद्भूत काम करणाऱ्या इंजिनिअर्सचेही आभार मानले पाहिजेत, याचे भान टीकाकारांनी ठेवावे", असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. (Devendra Fadnavis)

Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी