Raj thackeray : वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे दाखवून द्या!

राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास होत असल्याची टीका


मुंबई : "महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि उमद्या राजकीय संस्कृतीची बरोबरी आता उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांशी होऊ लागली आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री रोज बेताल विधाने करत असून लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसणाऱ्या आपल्या आमदारांवर आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाही. 'आपला माणूस' म्हणून चुका पाठीशी घालण्याच्या या भूमिकेमुळे राज्याची प्रतिमा डागाळत असून, वेडंवाकडं वागणाऱ्यांना देवेंद्र फडणवीस जबर शासन करतात हे आता एकदा कृतीतून दाखवून द्या," असे आवाहन करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.(Raj thackeray )



चेंबूर येथील शाळकरी मुलाचा मृत्यू आणि साकीनाका मॅनहॉल दुर्घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळलेली असतानाच, भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांचा विधिमंडळ परिसरातील एक व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये ते गंभीर दुर्घटनांचा संदर्भ देताना हसताना दिसत असल्याचा दावा विरोधकांनी केला असून, त्यावरून भाजपवर असंवेदनशीलतेचे आरोप होत आहेत. यावरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे.आपल्या ३७ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा दाखला देत राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा वेगळा होता. भूतकाळातील ज्येष्ठ नेत्यांनी स्वपक्षाच्या नेत्यांकडून चूक झाली, तरी ती कधी पाठीशी घातली नाही. मात्र, सध्या 'अमर्याद सत्ता माणसाला भ्रष्ट करते', या वाक्याचा प्रत्यय भाजपचे सहकारी आणून देत आहेत. कोणाला कशाचाच खेद किंवा खंत उरलेली नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे."देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि संवेदनशील मुख्यमंत्री आहेत, असे संपूर्ण महाराष्ट्राला आणि मलाही वाटत होते. मात्र, अशा गंभीर घटनांवर तुमच्याकडून अवाक्षरही बोलले जात नाही, तेव्हा तुमच्या संवेदनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते. तुमचे नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवत असून त्यांना कोणतीही समज दिली जात नसल्यानेच त्यांची पुन्हा चूक करण्याची हिंमत होते", असा आरोपही त्यांनी केला.(Devendra Fadnavis)



चुकीचे पायंडे पाडू नका, राजीनामे घ्या!


मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या चुकांवर पांघरूण घालणे बंद करावे, असा सल्ला देताना राज ठाकरे यांनी इशारा दिला की, "तुम्ही जर हे थांबवले नाही, तर स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा माणूस इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील. बेफाम वागणाऱ्यांकडून तातडीने राजीनामे घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपली प्रशासकीय पकड आणि वचक पुन्हा सिद्ध करावा", अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Nashik Crime : एटीएसच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’, नाशिकच्या मॅनेजरची ९० लाखांची फसवणूक

Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी स्वतःला एटीएस आणि मुंबई

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Nashik : गणेशोत्सवापूर्वी नाशिक पोलिस ॲक्शन मोडमध्ये ! नाशिकमध्ये मुक्काम असलेल्या तडीपार गुन्हेगारांची ‘धरपकड’ मोहीम

Nashik : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक पोलीस ॲक्शन मोडमध्ये