Ratnagiri News : धक्कादायक! दिड वर्षांच्या चिमुकल्यासह आईने मारली मांडवी एक्सप्रेसमधून उडी

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक (Ratnagiri News) अत्यंत धक्कादायक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शुक्रवार ३ जुलै रोजी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. मडगावहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या (Ratnagiri News) धावत्या मांडवी एक्सप्रेसमधून एका महिलेने आपल्या लिव्ह-इन पार्टनर आणि अवघ्या दीड वर्षांच्या निष्पाप चिमुकल्यासह मुसळधार पावसात बाहेर उडी घेतल्याचा थरार घडला आहे.



नेमकं प्रकरण काय ?

मडगावहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमधून महिलेने आपल्या लिव्ह-इन पार्टनर आणि अवघ्या दीड वर्षांच्या निष्पाप चिमुकल्यासह मुसळधार पावसात उडी मारली. या घटनेत उडी मारलेल्या महिलेचं नाव शुभ्रा अतिश दिवेकर असे आहे. या महिलेने रेल्वे ट्रॅकवर उडी मारून आपलं जीवन संपवलं. तिच्या सोबत तिचा लिव्ह-इन पार्टनर सचिन सत्यवान जुवळे आणि त्यांचा दीड वर्षांचा लहान मुलगा याच वेळी त्यांनी सुद्धा उडी मारली मात्र सुदैवाने त्यांचा जीव वाचला असून सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार :


मुसळधार पाऊस आणि वेगाने धावणारी रेल्वे असल्याने उडी मारल्यानंतर तिघेही लोहमार्गाच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मेटे गावाच्या परिसरात काहीतरी पडल्याचा आवाज आल्यानंतर आणि रेल्वे प्रशासनाला संशय आल्यानंतर तातडीने खेड पोलीस आणि रेल्वे पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिघांनाही तातडीने खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच शुभ्रा दिवेकर यांचा मृत्यू झाला होता, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. सध्या शुभ्रा यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन (Post Mortem) करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर गंभीर जखमी झालेल्या सचिन जुवळे आणि त्यांच्या दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलावर उपचार सुरू आहेत.



प्राथमिक माहिती आणि उपलब्ध परिस्थितीवरून हा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, या हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटनेमागील नेमके आणि मूळ कारण काय होते, याचा शोध घेण्यासाठी खेड पोलीस आता तांत्रिक पुराव्यांच्या आणि नातेवाईकांच्या चौकशीच्या आधारे सखोल तपास करत आहेत.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी