TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले असून या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. नरेशकुमार पुरणचंद माहोर, संजयकुमार सुरेशचंद्र शर्मा आणि बाबूलाल नारायणसिंह कुशवाहा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिन्ही आरोपींना उत्तर प्रदेशातील आग्रा येथून ताब्यात घेण्यात आले असून त्यांना भिवंडी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या अटकेनंतर टीईटी पेपरफुटी प्रकरणातील अटक आरोपींची संख्या दहावर पोहोचली आहे. (TET Paper Leak)


प्राथमिक तपासात महिम पत्रण प्रा. लि. या आग्रा येथील प्रिंटिंग प्रेसमधून प्रश्नपत्रिका बाहेर काढण्याच्या कटात या तिन्ही आरोपींचा थेट सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रश्नपत्रिका छपाई प्रक्रियेदरम्यान गोपनीय माहिती बाहेर काढून ती रॅकेटमार्फत संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यात आल्याचा तपास यंत्रणांचा प्राथमिक अंदाज आहे. या संपूर्ण साखळीचा उलगडा करण्यासाठी आरोपींकडे कसून चौकशी सुरू असून अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. (TET Paper Leak)



या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्राबाहेर बिहार, हरियाणा, दिल्ली, आग्रा तसेच इतर राज्यांपर्यंत पोहोचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या धनादेशांची पडताळणी, आर्थिक व्यवहारांची चौकशी, मोबाईल आणि डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण तसेच या रॅकेटमधील इतर साथीदारांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. या संघटित रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. (TET Paper Leak)


प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेमार्फत विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. डीसीपी पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली हे पथक राज्यासह देशातील विविध भागांमध्ये या रॅकेटचे नेटवर्क उघड करण्यासाठी काम करत आहे. तपासासाठी पोलिसांची विशेष पथके हरियाणा, बिहार आणि दिल्ली येथे रवाना झाली असून संबंधित व्यक्तींची माहिती गोळा केली जात आहे. (TET Paper Leak)



दरम्यान, हे रॅकेट अत्यंत संघटित पद्धतीने कार्यरत असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याने आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका लागू करण्याबाबत कायदेशीर पडताळणी सुरू आहे. या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी अटकसत्र आणि मोठे खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. (TET Paper Leak)

Comments
Add Comment

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी