Vaibhav Sooryvanshi : वैभवची इन्स्टा पोस्ट व्हायरल! दुसऱ्या सामन्यात पदार्पण होणार ? चर्चांना उधाण

Manchester : भारत आणि इंग्लंड मधील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज (जुलै) रोजी मॅंचेस्टर येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात वैभवला संधी दिली जाणार की नाही ? यावर सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र वैभवच्या इन्स्टा पोस्टने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे.या सामन्यापूर्वी वैभवने एक खास इन्स्टा पोस्ट शेअर केली. ज्यात वैभवने स्वत: चा एक फोटो शेअर करत 'New Chapter ' असे कॅप्शन लिहिले आहे. सध्या या पोस्टमुळे वेगळीच चर्चा रंगली आहे. ही पोस्ट वैभवचे इंटरनॅशनल क्रिकेटमधील पदार्पणाचे संकेत आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. सोशल मीडियावर वैभवच्या डेब्यूबाबत सातत्याने चर्चा केली जात आहे.(Vaibhav Sooryvanshi)






New Chapter पोस्टमुळे चर्चांना उधान

वैभवच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे.हे त्याच्या डेब्यूचे संकेत आहेत का? याबाबत लोक आपापले मत मांडत आहेत. विशेष म्हणजे आयर्लंड दौऱ्यावर वैभवला खेळण्याची संधी मिळाली नव्हती, ज्यामुळे चाहते आणि माजी दिग्गज खेळाडू प्रचंड नाराज झाले होते. अगदी सुनील गावस्कर यांनाही समजू शकलेले नाही की, अखेर वैभवला आयर्लंड दौऱ्यात संधी का देण्यात आली नाही? इतकेच नव्हे तर आयर्लंड दौरा हे एक असे व्यासपीठ होते जिथे वैभवला संधी मिळायला हवी होती, असे रवी शास्त्री यांनीही मान्य केले आहे.(Ind vs Eng)






गोलंदाजी प्रशिक्षकचे विधान चर्चेत


जरी वैभवच्या इंस्टाग्राम स्टोरीमुळे त्याच्या पदार्पणाबद्दलच्या चर्चांना उधाण आले असले तरी, गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्केल यांनी सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत एक वेगळाच संकेत दिला. दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी बोलताना मॉर्केल म्हणाले, "आमच्याकडे अभिषेक शर्मासारखा एक अव्वल दर्जाचा टी-२० फलंदाज आहे. संजू सॅमसनही विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता आणि त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे, प्रशिक्षकाने खेळाडूंवर विश्वास ठेवणे आणि त्यांना पाठिंबा देणे योग्यच आहे. होय, एक तरुण खेळाडू संधीची वाट पाहत आहे आणि हे एक सकारात्मक चिन्ह आहे. तथापि, आम्ही आमच्या खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे—केवळ या दोघांवरच नाही, तर संपूर्ण संघावर."

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून