Mayor Ritu Tawde : कुर्ल्यातील वृक्ष दुर्घटनेनंतर महापौर ॲक्शन मोडमध्ये! मृताच्या कुटुंबाला ₹५ लाखांची मदत; मुंबईत तातडीच्या ट्री ऑडिटचे आदेश

मुंबई : कुर्ला (पश्चिम) येथील नौपाडा परिसरात झाडाची फांदी कोसळून ६३ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे (Mayor Ritu Tawde) यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दुर्घटनेचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची तात्काळ आर्थिक मदत जाहीर केली. तसेच, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संपूर्ण मुंबईत झाडांचे तातडीने ट्री ऑडिट करून धोकादायक झाडांच्या छाटणीची मोहीम युद्धपातळीवर राबविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.


शनिवारी (५ जुलै) दुपारच्या सुमारास कुर्ल्यातील नौपाडा परिसरात एका दुकानावर झाडाची मोठी फांदी अचानक कोसळली. या दुर्घटनेत स्थानिक रहिवासी युनूस कुंडावाला (वय ६३) गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Mayor Ritu Tawde)



घटनेची माहिती मिळताच महापौर रितू तावडे (Mayor Ritu Tawde) यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी मृताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि महानगरपालिकेच्या वतीने ५ लाख रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली.


पाहणीदरम्यान महापौरांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारी आणि समस्या जाणून घेतल्या. पावसाळ्यात मुंबईत झाडे कोसळण्याच्या वाढत्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शहरातील सर्व धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. ज्या ठिकाणी झाडे किंवा फांद्या धोकादायक स्थितीत आहेत, तेथे त्वरित छाटणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. (Mayor Ritu Tawde)



"नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही. पावसाळ्यात संभाव्य धोके ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात," असे स्पष्ट निर्देश महापौरांनी (Mayor Ritu Tawde) महानगरपालिका प्रशासनाला दिले.



दरम्यान, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे धोकादायक झाडांची छाटणी, नियमित ट्री ऑडिट आणि आपत्कालीन यंत्रणा अधिक सतर्क ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या पाहणीवेळी स्थानिक नगरसेवक तथा सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे, नगरसेवक नितेश सिंह, महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी तसेच स्थानिक पोलीस अधिकारी उपस्थित होते. (Mayor Ritu Tawde)


Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा