Aamir khan 3rd wedding: मुसळधार पावसामुळे अंबानी कुटुंबाचा ताफा काही काळ थांबला; आमिर खानच्या विवाह सोहळ्यासाठी जाताना घडली घटना

मुंबई : रविवारी मुंबईत दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वाहतुकीवर परिणाम झाला. वांद्रे परिसरातील नर्गिस दत्त रोडवर झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक थांबवावी लागली. याच मार्गावरून अभिनेता आमिर खान (Amir Khan) आणि गौरी स्प्रॅट (Gauri Spratt) यांच्या विवाह सोहळ्यासाठी निघालेला अंबानी कुटुंबाचा ताफाही जात होता. त्यामुळे ताफ्याला काही वेळ रस्त्यात थांबावे लागले.



जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या रस्त्यावर कोसळल्यानंतर वाहतूक पोलिसांनी आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावरील अडथळा दूर करण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. त्यानंतर अंबानी कुटुंबाचा ताफाही नियोजित स्थळी रवाना झाला. (Aamir khan 3rd wedding)


दरम्यान, आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांचा विवाह सोहळा मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी साध्या आणि खासगी पद्धतीने पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या सोहळ्याला कुटुंबीय, जवळचे मित्र आणि चित्रपटसृष्टीतील निवडक मान्यवर उपस्थित होते.



दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि त्यांची पत्नी सुनीता गोवारीकर हे समारंभाला उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांपैकी होते. पावसामुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी विवाह सोहळा नियोजनानुसार पार पडला.


आमिर खान यांच्या वैयक्तिक आयुष्यातील हा नवा टप्पा मानला जात आहे. यापूर्वी त्यांचे रीना दत्ता आणि किरण राव यांच्याशी विवाह झाले होते. दोघांपासून वेगळे झाल्यानंतर आता त्यांनी गौरी स्प्रॅट यांच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.


Comments
Add Comment

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी मुंबई : मुंबईत सध्या इंटरनेट,

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय